शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

आदिक, मुरकुटे, चित्ते यांच्यात एकमत होईना

By admin | Published: October 19, 2016 12:42 AM

श्रीरामपूर: श्रीरामपूर नगरपालिकेत कॉँग्रेसकडून विद्यमान नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित झाले असताना

श्रीरामपूर: श्रीरामपूर नगरपालिकेत कॉँग्रेसकडून विद्यमान नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित झाले असताना विरोधकांमध्ये मात्र अजूनही उमेदवारीबाबत एकमत होत नाही. अनुराधा आदिक, मंजुश्री मुरकुटे व दीपाली चित्ते यांच्यात उमेदवारीवरून एकमत होत नाही. मुरकुटे व चित्ते दोघेही उमेदवारीवर ठाम असल्याने नगराध्यक्षपदाचा तिढा कसा सुटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ससाणेविरोधक नगरपालिका निवडणुकीत एकवटतात. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. राजश्री ससाणे यांची कॉँग्रेसकडून उमेदवारी निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार भानुदास मुरकुटे हे स्नुषा मंजुश्री यांच्यासाठी आग्रही आहेत. भाजपचे जिल्हा संघटक प्रकाश चित्ते हेही त्यांच्या पत्नी दीपाली यांच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे स्व. गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांचेही नाव नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अग्रभागी आहे. गत विधानसभा निवडणुकीत शहरातील अनेक बूथवर राष्ट्रवादीपेक्षा भाजप आघाडीवर होते, त्यामुळे नगराध्यक्षपदाची संधी भाजपला मिळावी, असा मतप्रवाह भाजपात आहे. दुसरीकडे ससाणे विरुद्ध मुरकुटे पारंपरिक अशी सरळ लढत होण्यासाठी मुरकुटे जोर लावून आहेत. चित्ते यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला मुरकुटे यांचा विरोध आहे. महाविकास आघाडी होऊन चित्ते यांना उमेदवारी द्यावी यासाठी ससाणे विरोधक मुरकुटे यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनुराधा आदिक यांचा सर्वस्वी निर्णय हा अविनाश आदिक यांच्यावर आहे. अविनाश आदिक यांनी अजूनही उमेदवारीबाबत निर्णय घेतलेला नाही. प्रदेश भाजपच्या बैठकीत सेनेसोबत युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर देण्यात आले असल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिली. भाजपला नगराध्यक्षपदाची संधी दिल्यास श्रीरामपूर पालिकेत भाजप-सेनेची युती होणे शक्य आहे. भाजप त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे समजते. सेनेकडून मात्र यावर कोणी काहीच प्रतिक्रिया देत नाही. (प्रतिनिधी)