शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

रेल्वे प्रवासातील अनोखे व्यक्तीमत्व...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:02 PM

अख्खा भारत एकाच ठिकाणी पाहायला मिळणारं ठिकाण म्हणजे रेल्वे. मार्क्स-लेनिनने मांडलेल्या क्लास थिएरीचा उलगडाच रेल्वेतूनच होतो.

शिवाजी पवार

अहमदनगर : अख्खा भारत एकाच ठिकाणी पाहायला मिळणारं ठिकाण म्हणजे रेल्वे. मार्क्स-लेनिनने मांडलेल्या क्लास थिएरीचा उलगडाच रेल्वेतूनच होतो. मग ते स्लिपर बोगीतील मध्यमवर्गीय असोत की एसीचे टू टियर आणि थ्री टीयरचा उच्चभू्र वर्ग. सर्वसामान्य पोटाची खळगी भरणाऱ्या आणि कायमच स्थलांतराचे जीवन जगणाºयांसाठीचे एक-दोन जनरल डबे. भाषा, प्रांत, संस्कृती, मानवी स्वभावातील कल्पना पलीकडील पैैलूंचा उलगडा होतो. ते पाहून कधीकधी कल्पना शक्तीदेखील खुजी पडते. असाच एकदा प्रवासादरम्यान अनुभवलेले अनोखे व्यक्तीमत्व...एकदा नगरहून श्रीरामपूरला प्रवास करत असताना दुपारच्या पॅसेंजरमधील (अर्थातच जनरल डबा) घटना. दौंड-नांदेड रेल्वे होती ती. यात मराठवाडा, विदर्भातील मजुरांचा भरणा जास्तच असतो. पुण्यात बांधकाम व्यवसायात पोटाची खळगी भरणे अथवा बागायतदारांकडे सालाने कामे करणारी ही मंडळी. अख्खं कुटुंबच स्थलांतरित होतं. बायका-पोरांसह एक दोन गाठोड्यातला त्यांचा प्रपंच. अशाच काही मजुरांच्या गप्पा अधूनमधून ऐकत होतो. पश्चिम महाराष्टÑातल्या धरणांच्या गप्पा मारत होते ते. कोणते धरण कुठल्या तालुक्या-जिल्ह्यात आहे आणि त्याचे पाणी कुठल्या भागात पोहोचते असा विषय. असा काय तो विषय होता त्यांच्या चर्चेचा असेल हे सांगता येणं कठीण. भूगोलाच्या ज्ञानात एकमेकांत भारी पडण्याचा त्यांच्यात प्रयत्न सुरू होता. तेवढ्यात एक तृतीयपंथी पैसे उकळायला आला. त्या सगळ्या मजुरांनी दहा-दहा रुपये इमानेइतबारे दिले. न बोलता, वाद न घालता, अगदी चुपचाप. यानंतर कुठल्यातरी एका स्टेशनवरून चाळीशीतला एकजण येऊन धडकला. धडकलाच म्हणावं लागेल त्याला. शरीरयष्टी होतीच तशी त्याची. कडक व लालबुंद नजर, खाकी रंगाची पँट, काहीसा मळालेला शर्ट आणि त्या शर्टबाहेर सारखे बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेले त्याचे पोट. रूंद चेहरा आणि चेहºयावरील व्रणामुळे भेदक दिसत होता तो. पढेगाव स्थानकावरून बसला तो.एवढ्यात त्या मजुरातील एकाने (बारीक शरीरयष्टीचा) सवयीप्रमाणे बिडी काढली. चार-पाच मित्र होते त्यासोबत. बिडी पेटवणार तोच त्या खाकी पॅटवाल्यानं बिडीचा कट्टा त्या मजुराच्या हातातून हिसकावून घेतला. ‘काय रे बिडी पिती का हरामखोरा’, तो खेकसला. ‘नाही साहेब पित नव्हतो, फक्त पाहत होतो’, बारीक आवाजाने कसबसं स्पष्टीकरण दिलं.‘कसकाय बिडी पितो रे, रेल्वेचे कायदे तुला माहीत नाही का?’ असा दम भरला त्या पठ्ठ्यानं. दोन डब्यातल्या मोकळ्या जागेत हे सगळं घडत होतं. दोन-तीन कॉलेजची लोकल पोरंही होती आजूबाजूला. वातावरण थोड्याच वेळात गंभीर बनलं. ‘तुझी फुकट राहण्याची, जेवणाची सोय करू का?’ तो तरूण पुन्हा गरजला. या वाक्याचा अर्थ क्षणभर कोणालाच कळला नाही. ‘रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देतो हरामखोरा तुला’, पुन्हा डरकाळी फोडली त्यानं. या दरम्यान मजुरांचं ते टाळकं कुठं विखुरलं गेलं काहीच कळालं नाही. तो एकटाच तिथं राहिला होता. ‘चुकलं साहेब, फेकून द्या ती बिडी, परत न्हायी पिणार’ रडवलेला चेहरा आणि जीव काकुळतीला येऊन तो मजूर म्हणाला.‘मी धरल्यावर असंच म्हणणार तू. एवढ्यात त्याने माझ्याकडं पाहत डोळा मारला. रॅगिंग घेत होता त्यांची एव्हाना हे माझ्या लक्षात आले. श्रीरामपूर स्टेशन जवळ येत होतं. प्रकरण आता निवेल असेही वाटलं.पण आता मात्र प्रकरण शिविगाळीपर्यंत गेल. एवढंच काय तो तरूण धावून गेला त्या मजुरावर. त्याच क्षणी तो फिरकी घेत होता हा विचार गळून पडला.‘मुस्काड फोडीन तुझं, कोणकोण आहे तुझ्याबरोबर, चला उतरा खाली आता.’ श्रीरामपूरला पोलिसांच्या ताब्यात देतो तुम्हाला. ‘गाडी पेटवायची होती काय तुम्हाला. बिडीचा कट्टा लपवू नको’. तो आणखी आक्रमक झाला. तो मजूर आपल्या सहकाºयांबरोबर वरच्या सीटवर गर्दीत जाऊन बसलेला होता. हा पठ्ठ्या खाली उभा राहूनच शिवीगाळ करत होता.तो मजूर नजरेनेच माझ्याकडे विचारणा करत होता. खरंच पोलीस आहे का तो? हा त्याचा प्रश्न होता. कुठलीही प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत मी नव्हतो. कारण मारामारीच्या उंबरठ्याावरच प्रसंग आला होता. बोगीतील कुणीही प्रवासी हसण्याचा प्रयत्न करत नव्हते. त्यानं वातावरण अधिकच गंभीर झाले.एवढ्याात श्रीरामपूर स्टेशनवर गाडी पोहोचली. ती मजूर मंडळी शांतपणे बसलेली होती. आजूबाजूला वरच्या सीटवर बसलेले त्याचे सहकारी आम्ही त्याच्याबरोबर (पीडित) नसल्याचेच जणू दाखवत होते.गाडी थांबल्यावर उतरला अखेर तो. मीही पटकन त्याच्या मागोमाग चालायला लागलो. नक्की कोण आहे हा मलाही प्रश्न पडलेला होता. स्टेशनबाहेर मुख्य रस्त्यापर्यंत आलो मी. तेवढ्या वेळात रस्ता पार करून गेला होता पठ्ठ्या. पलिकडेच बुक स्टॉलवर जाऊन पोहोचला. मागोमाग उभे राहून अगदी निरखून सर्व पाहत होतो मी. पुस्तकाच्या दुकानात काय करतोय हा, आता मात्र माझे कुतूहल वाढले होते. आश्चर्य वाटत होतं.बुक स्टॉलवर एका फळ्याला पोलीस भरतीच्या जाहिराती चिकटविलेल्या होत्या. निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार अशा स्वरूपाच्या जाहिरातींची कात्रणे जास्त दिसली. मात्र, जागांची संख्या अवघी ५-१०वर होती. थोड्याच वेळात जाहिराती वाचण्यात दंग झाला होता तो. सिरियस बनलेला तो...नक्की कोण होता. त्याचा हळूहळू उलगडा आता झाला होता. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर