Two killed in car accident on Nagar-Pune highway | नगर-पुणे महामार्गावर कार अपघातात दोन ठार
नगर-पुणे महामार्गावर कार अपघातात दोन ठार

पळवे : भरधाव वेगाने जाणारी कार पुलाला धडकून ओढ्यात कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. नगर-पुणे महामार्गावरील पळवे फाट्यावर शनिवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
प्रतिक ललितकुमार राठोड (रा. खडकमळा, तळेगाव दाभाडे, जि. पुणे), नमन कोठारी (रा. बेंगलोर, कर्नाटक) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. 
 नगर-पुणे महामार्गावर पळवे फाट्यावर शनिवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास पुण्याहून नगरकडे भरधाव वेगाने जाणारी हुंडाई कार (क्रमांक एम. एच. ०४. बी. वाय.-९६२२) हॉटेल जगदंबजवळ असलेल्या पुलाला धडकली. धडकेनंतर कार शेजारील ओढ्यात कोसळली. दरम्यान या अपघातात कारमधील प्रतिक आणि नमन हे दोघेही ठार झाले. घटनेनंतर पळवे शिवारातील नागरिकांनी सुपा पोलिसांच्या मदतीने ती कार व मयतांना मोठ्या परिश्रमाने बाहेर काढले. अपघातातील दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेने पारनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघातामुळे काही काळ नगर-पुणे रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. 

Web Title: Two killed in car accident on Nagar-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.