शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

रिक्षाचा प्रवास... चक्क फुक्काट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 4:10 PM

साकुरी : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावात अद्याप सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही़ त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करुन बक्कळ पैसा कमविण्याची संधी असताना एका तरुणाने चक्क गावक-यांना मोफत रिक्षासेवा सुरु केली आहे़ खडकेवाके ते राहाता असा सहा किलोमीटरचा प्रवास चक्क फुक्कट करण्यास मिळू लागल्यामुळे गावात आनंदीआनंद आहे़राहाता तालुक्यातील खडकेवाके हे जेमतेम लोकसंख्येचे गाव. स्वातंत्र्याच्या ...

साकुरी : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावात अद्याप सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही़ त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करुन बक्कळ पैसा कमविण्याची संधी असताना एका तरुणाने चक्क गावक-यांना मोफत रिक्षासेवा सुरु केली आहे़ खडकेवाके ते राहाता असा सहा किलोमीटरचा प्रवास चक्क फुक्कट करण्यास मिळू लागल्यामुळे गावात आनंदीआनंद आहे़राहाता तालुक्यातील खडकेवाके हे जेमतेम लोकसंख्येचे गाव. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावात अद्याप एस़टी़ बस येत नाही़ खासगी प्रवासी वाहतुकीचीही सुविधा नाही़ राहाता हे शहर अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असूनही गावकºयांना बाजाराला येण्या-जाण्यासाठी अनेकांच्या हाता-पाया पडून लिफ्ट मागावी लागते़ लिफ्ट मिळाली तर ठीक अन्यथा राहात्याची वारी ही पायीच ठरलेली़ त्यात आठवड्याचा बाजार करुन तो बोजा पाठीवर घेऊन येणे म्हणजे डोंगर उचलूनच गाव गाठल्यासारखे़ गावक-यांच्या वेदना जाणून खडकेवाके येथील सचिन मुरादे पाटील या तरुणाने गावक-यांसाठी चक्क मोफत रिक्षा सेवा सुरु केली़ गुरुवारी आठवडे बाजाराचे औचित्य साधून राहाता पंचायत समितीचे उपसभापती बाबासाहेब म्हस्के यांच्या हस्ते या मोफत रिक्षा सेवेचा प्रारंभ करण्यात आला़ खडकेवाके ग्रामस्थांना आठवडे बाजारात येण्या-जाण्यासाठी सचिन मुरादे या तरुणाने चक्क चार रिक्षा खरेदी केल्या़ या रिक्षांच्या माध्यमातून त्याला बक्कळ पैसा कमावण्याची संधी असताना त्याने चक्क चारही रिक्षांमधून ग्रामस्थांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे़ त्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे़