शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

शिर्डीतून वाहतूक पोलीस बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 9:37 PM

शिर्डीत नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस संजय शिंदे (वय ४०, रा. राजुरी, ता. राहाता) दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या वृद्ध आईवर मुलास शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तपास सुरू असल्याचे नेहमी इतरांना देण्यात येणारे उत्तर या वृद्ध आईलाही मिळत आहे.

शिर्डी : शिर्डीत नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस संजय शिंदे (वय ४०, रा. राजुरी, ता. राहाता) दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या वृद्ध आईवर मुलास शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तपास सुरू असल्याचे नेहमी इतरांना देण्यात येणारे उत्तर या वृद्ध आईलाही मिळत आहे.गेल्या २० डिसेंबरला ते ड्युटीवर चाललो म्हणून घरातून निघाले. संजय घरी न आल्याने आईने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. २४ डिसेंबरला पोलीस ठाण्यातूनच संजयला ड्युटीवर पाठवा, असा निरोप आल्यानंतर तो बेपत्ता असल्याचा उलगडा झाला. यानंतर त्यांच्या आईने धावतपळत जाऊन शिर्डीत पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली.‘माझा पोलीस लेक दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे. कुणी पाहिलंय का माझ्या लेकाला? कुणीतरी त्याला शोधून आणा रे!’ अशी विनवणी करीत संजयची आई पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवित आहे़ आपला मुलगा पोलीस होता. त्यामुळे पोलीस त्याला नक्की हुडकून काढतील, या आशेवर ती त्याची वाट पहात आहे. संजय यांची पत्नी धुळे पोलिसात असून, दोघांचे न्यायालयात वाद सुरू असल्याचे समजते.

संजय शिंदे यांचा शोध सुरू आहे़ त्यांनी एकदा बु-हाणपूर व एकदा भुवनेश्वर येथे एटीएममधून पैसे काढले आहेत. दोन्हीही ठिकाणे रेल्वे स्थानकालगतची आहेत. खात्यात बरेच पैसे असतानाही थोडे थोडे काढण्यात येत आहेत. यावरून ते सुरक्षित असावेत़ मात्र त्यांनी घरी संपर्क केलेला नाही. त्यांनी मोबाईल बंद केलेला आहे. मात्र आयएमईआय क्रमांकावरून दुसरा एखादा नवीन क्रमांक सुरू केला काय? याचा शोध घेण्यात येत आहे. तसे झाले तर त्यांचे ठिकाण मिळून शोध घेण्यास मदत होईल.-संदीप दहिफळे, फौजदार तथा तपासी अधिकारी, शिर्डी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी