शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

पर्यटकांच्या गर्दीने भंडारदरा परिसर ओव्हर-फ्लो! नाताळनिमित्त सुट्यांची पर्वणी; दोन हजार कापडी तंबू सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 8:19 PM

नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांमधे जलाशयाच्या भोवती पर्यटकांच्या निवासासाठी जवळपास दोन हजार कापडी ‘तंबू’सज्ज झाले असून, नाताळनिमित्त ‘भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद’ परिसरात पर्यटकांचा फुलोरा फुलला आहे.

हेमंत आवारीअकोले : नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांमधे जलाशयाच्या भोवती पर्यटकांच्या निवासासाठी जवळपास दोन हजार कापडी ‘तंबू’सज्ज झाले असून, नाताळनिमित्त ‘भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद’ परिसरात पर्यटकांचा फुलोरा फुलला आहे.‘तंबू’ हे यावर्षीचे खास नवे आकर्षण आहे. भंडारदरा जलाशयाभोवती ४५ किलोमीटरचा रिंगरोड असून, या परिसरात धरणाच्या काठावर आदिवासी युवकांनी पर्यटकांच्या निवासासाठी कापडी तंबू उभारले आहेत. भंडारदार शेंडी येथील पर्यटन विकास महामंडळाचे लेक व्ह्यू, आनंदवन, यश, अमीत, अमृत व्हिला आदींसह सर्व रिसोर्ट, हॉटेल व शासकीय विश्रामगृहे गर्दीने ओसंडल्याने पर्यटकांसाठी स्थानिक युवकांनी वन्यजीव व आदिवासी विभागाच्या मदतीने मिळालेल्या कापडी तंबंूच्या साहाय्याने तात्पुरती निवास व्यवस्था केली आहे.

मुरशेत, पांजरे-उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल या भागांतील शेकडो आदिवासी तरुणांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे येथील शेकडो तरुणाईला रोजगार उपलब्ध झाला आहे. साधारणपणे प्रतिव्यक्ती ४५० ते १२०० रुपयांपर्यंत एक दिवसाचा खर्च पर्यटकांकडून घेतला जातो. चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण, शेकोटी, बोटफेरी अशा सुविधा दिल्या जातात. जलाशयानजीक हे तंबू लावलेले असून, पाण्याच्या निळाईत शेकोटीची धग निवळताना दिसते. परिसरात आशिया खंडातील दोन नंबरची गूढरम्य सांधन दरी, शिखर स्वामिनी कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, आज्या पर्वत, आलंग-मलंग-कुलंग गड, घनचक्कर, करंडा, खुंटा, कात्राईची खिंड आदी गड, डोंगर असून, येथे सलग सुट्यांमुळे पर्यटक व गिर्यारोहकांची मांदियाळी आहे. मुंबई-नाशिक भागातील पर्यटक तुलनेने जास्त आहे. एक दिवसाच्या कौटुंबिक सहलीपण मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावताना दिसत असून, नौकाविहराचा आनंद घेतात.भंडारदरा धरणाच्या ‘स्पिल वे’सांडवा गेट जवळ पाण्याच्या कडेला पर्यटकांना कॅम्पिंगचा आनंद मिळावा म्हणून जवळपास २५० तंबू लावण्यात आले आहेत. येथे सतत वाहतुकीची कोंडी अनुभवास येत असून, पर्यटक व वाहनांच्या गर्दीने हा परिसर फुलला आहे.

कळसूबाईगडावर अस्वच्छता आहे. येथील छोटे व्यावसायिकच सिगारेट, दारू पाहिजे का? असे विचारतात, मग स्वच्छाता कशी राहणार? गडाच्या पायथ्याला गाडी पार्क करतो. तेथेही गडावर यांना भेटा ते तुमची सर्व सोय करतील? असे सांगितले जाते. पोलिसांनी व वन विभागाने याची दखल घ्यावी.-सुहास कदम, चेंबूर, गिर्यारोहक.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले