Three persons, who were riding on a bike without any reason in the corner, were booked | कोपरगावात विनाकारण दुचाकीवरून फिरणा-या तिघांवर गुन्हा दाखल

कोपरगावात विनाकारण दुचाकीवरून फिरणा-या तिघांवर गुन्हा दाखल

कोपरगाव : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. तरीही कोपरगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी तोंडाला मास्क न लावता दुचाकीवरून विनाकारण फिरणा-या तिघांवर पोलिसांनी शनिवारी ( दि.२८ मार्च ) रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलेश अण्णासाहेब जाधव (वय २८ रा. १०५, हनुमाननगर, कोपरगाव ), संतोष यशवंत तळोले (वय ४५ रा. मुसळे वस्ती, लोणी बुद्रुक ता. राहता ), स्वप्नील रमेश घोगरे (वय २० रा. गांधीनगर,कोपरगाव ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान वरील तिघाकडील तीनही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे.

Web Title: Three persons, who were riding on a bike without any reason in the corner, were booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.