शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 3:18 PM

श्रीरामपूर येथील इसमाने झाडाला गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येप्रकरणी पंधरा दिवसानंतर एका खासगी फायनान्स कंपनीच्या तिघा कर्मचा-यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज वसुलीसाठी लावलेल्या तगाद्यातून हे कृत्य केल्याचे तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते.

श्रीरामपूर : गोंधवणी येथील इसमाने झाडाला गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येप्रकरणी पंधरा दिवसानंतर एका खासगी फायनान्स कंपनीच्या तिघा कर्मचा-यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज वसुलीसाठी लावलेल्या तगाद्यातून हे कृत्य केल्याचे तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते.    आत्महत्या केलेले संतोष पालकर यांच्या पत्नी गंगा संतोष पालकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन बजाज कंपनीचे वसुली अधिकारी तनवीर सिंकदर तांबोळी, एजंट विनायक मुसमाडे (दोघे रा. श्रीरामपूर) व कार्यालय व्यवस्थापक (नाव माहिती नाही) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजाज फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी थकीत कर्ज वसुलीसाठी वारंवार तगादा करुन त्रास दिल्यामुळे संतोष घनश्याम पालकर (वय ४०) याने २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता वाकडी शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

 संतोष यांनी २०१८ मध्ये बजाज फायनान्स कंपनीकडून जनरल स्टोअर्स सुरु करण्यासाठी एक लाख रुपये कर्ज घेतले होते. मार्च २०२० पासून संचारबंदी सुरू झाल्यामुळे कर्जाचे हप्ते थकले.

पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी घटनेचा तपास केला. पोलिसांनी मयत संतोष यांचे फोन कॉल्स तपासले. त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरCrime Newsगुन्हेगारी