शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

श्रीपाद छिंदमविरोधात हजारो शिवप्रेमींचा नगरमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:03 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हजारो शिवप्रेमींनी नगरमध्ये मंगळवारी (दि़ ३) शिवसन्मान मोर्चा काढला.

ठळक मुद्देश्रीपाद छिंदमविरोधात २००१ मध्ये अवैध हत्यार बाळगणे व विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे.बुलडोझर चालवून दुकान उद्धवस्त करुन एका कुटुंबाचा छळ केल्याप्रकरणी छिंदमविरोधात दुसरा गुन्हा २०१० मध्ये दाखल करण्यात आला आहे.डिसेंबर २०१३ मध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल श्रीपाद व त्याचा भाऊ श्रीकांत या दोघावर तडीपारीची कारवाई केली होती. नोव्हेंबर २०१५ मध्ये दोघा भावांनी दोन तरुणींवर अत्याचार व हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे.फेबु्वारी २०१८ छिंदम याने शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबतही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हजारो शिवप्रेमींनी नगरमध्ये मंगळवारी (दि़ ३) शिवसन्मान मोर्चा काढला.माळीवाडा बसस्थानकाजवळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व शिववंदना करुन सकाळी अकरा वाजता मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात सर्वात पुढे महिला व त्यांच्यामागे पुरुष अशी या मोर्चाची रचना होती. या मोर्चात हजारो शिवप्रेमींनी सहभाग घेतला. मोर्चात छिंदमविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माळीवाडा, कापडबाजार, चितळेरोडमार्गे हा मोर्चा चौपाटी कारंजा येथे आला. 

तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांनी निवेदन वाचून दाखविले. हे निवेदन नंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. साडेबारा वाजता मोर्चा विसर्जित करण्यात आला. दरम्यान मोर्चाच्या मार्गावरील सर्व वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. मोर्चादरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, श्रीपाद छिंदमविरोधात २००१ मध्ये अवैध हत्यार बाळगणे व विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यानंतर बुलडोझर चालवून दुकान उद्धवस्त करुन एका कुटुंबाचा छळ केल्याप्रकरणी छिंदमविरोधात दुसरा गुन्हा २०१० मध्ये दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०१३ मध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल श्रीपाद व त्याचा भाऊ श्रीकांत या दोघावर तडीपारीची कारवाई केली होती. परतु राजकीय वरदहस्तामुळे ती बारगळली. नोव्हेंबर २०१५ मध्ये दोघा भावांनी दोन तरुणींवर अत्याचार व हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. फेबु्वारी २०१८ छिंदम याने शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबतही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आत्तापर्यंत छिंदमवर सहा प्रकारचे गुन्हे आहेत. मात्र, शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करुनही पोलिसांनी त्याच्याविरोधात सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी वाढीव कलम का लावले नाही, असा प्रश्न शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShripad Chindamश्रीपाद छिंदमBJPभाजपाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज