Third Kovid Center on behalf of Jito | जितोच्या वतीने तिसरे कोविड सेंटर

जितोच्या वतीने तिसरे कोविड सेंटर

या सेंटरचे उद्घाटन आ. माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी जितोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, पुणे शहर अध्यक्ष ओमप्रकाश रांका, चीफ सेक्रेटरी पंकज कर्नावट, ॲड. अभय छाजेड, सिद्धी ग्रुपचे मनोज छाजेड, इंदर जैन, इंदर छाजेड आदी उपस्थित होते.

मनोज छाजेड म्हणाले, सध्याच्या काळात कोरोनाला हरवायचे असेल तर प्रत्येकाने स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे. जितोने पुण्यात दोन अद्ययावत कोविड सेंटर सुरू केले आहेत. याठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधाही असल्याचे ते म्हणाले. यावेळी चेतन भंडारी, अशोक हिंगड, अजित सेटिया, रमेश गांधी, सुनील नहार, विलास राठोड, डॉ. हेमंत धोका, डॉ. केविन बोरा, लखीचंद खिंवसरा, आदेश खिंवसरा, हितेश शहा, संदीप लुणावत, सतीश हेरेकर, चेतन जैन, योगेश बाफना, अमित लोढा, गणेश कर्नावट, वैभव शहा, पराग दोशी, जयेश जैन, हर्षल ओसवाल आदी उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: Third Kovid Center on behalf of Jito

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.