शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

संगमनेरात तेल कंपनीच्या गोडावूनमध्ये चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 12:37 PM

गोडावूनचे शटर चोरट्यांनी तोडून आतील २० शेंगदाणा पोते, इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक वजन काटा, संगणक साहित्य, इलेक्ट्रिक बल्ब असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला.

संगमनेर : अकोले नाका परिसरातील श्याम आॅईल इंडस्ट्रिज या कंपनीचे गोडावून फोडून २० शेंगदाण्याचे पोते, एक इलेक्ट्रिक मोटार, एक इलेक्ट्रॉनिक काटा, संगणक साहित्य असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.अकोले नाका परिसरातील मालपाणी हेल्थ क्लब रस्त्यावर श्याम आॅईल इंडस्ट्रिज ही शेंगदाणा तेल उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या गोडावूनमध्ये शेंगदाणा तेल निर्मितीसाठी शेंगदाण्याचे पोते साठविलेले होते. तसेच तेथे एक इलेक्ट्रिक मोेटार, एक इलेक्ट्रीक वजन काटा, संगणक असे साहित्य होते. नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम संपल्यानंतर गोडावून बंद करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी रात्री चोरट्यांनी गोडावूनच्या गेटवरुन उड्या मारुन आतमध्ये प्रवेश केला. गोडावूनचे शटर चोरट्यांनी तोडून आतील २० शेंगदाणा पोते, इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक वजन काटा, संगणक साहित्य, इलेक्ट्रिक बल्ब असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. गोडावनूच्या सुरक्षेसाठी कंपनीच्यावतीने काहीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. दरम्यान बुधवारी रात्री गोडावून समोर एक टेम्पो येऊन थांबला होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या चोरीबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrimeगुन्हाPoliceपोलिसSangamnerसंगमनेरtheftचोरी