शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

कट मारल्याने दोन गटात तणाव

By admin | Published: July 07, 2016 11:13 PM

जामखेड : स्कॉर्पिओ गाडीने कट मारल्याच्या कारणावरून अज्ञात दहा ते पंधरा जणांनी स्कॉर्पिओ चालक व त्याच्या सहकाऱ्यास लाठीकाठीने जबर मारहाण करून जखमी करीत गाडीची काच फोडली.

जामखेड : बीड रस्त्यालगतच्या सरकारी दवाखान्यासमोर स्कॉर्पिओ गाडीने कट मारल्याच्या कारणावरून अज्ञात दहा ते पंधरा जणांनी स्कॉर्पिओ चालक व त्याच्या सहकाऱ्यास लाठीकाठीने जबर मारहाण करून जखमी करीत गाडीची काच फोडली. मारहाण झालेले तिघे स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला. उमेश निळकंठ नायकिंडे, भाऊसाहेब महादेव मुंढे, एकनाथ अश्रुबा मुंढे (सर्व राहणार पारसांगवी ता. भूम जि. उस्मानाबाद) हे जामखेडमध्ये शेतमालाची खरेदी करून स्कॉर्पिओ (क्रमांक एमएच ०२ बी झेड ३५५१)गाडीने बीड रस्त्यावरून गावी जाताना सरकारी दवाखान्यासमोर त्यांच्याकडून मोटारसायकल चालकाला कट बसला. स्कॉर्पिओ चालकाने कट मारल्याचा राग धरून दहा ते पंधरा जणांना बोलावून स्कॉर्पिओ चालक उमेश नायकिंडे व गाडीमध्ये बसलेले भाऊसाहेब मुंढे, एकनाथ मुंढे यांना लाठीकाठी, गज यांनी जबर मारहाण सुरू केली. मारहाणीच्या भीतीने वाहनचालकाने वाहन घेऊन पळ काढला. खर्डा चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे हे वाहन तेथे थांबले असता तेथे मागून आलेल्या टोळक्याने वाहनचालकास व वाहनातील दोघांना लाथाबुक्कयाने व काठीने जबर मारहाण केली. काहींनी गाडीच्या काचा गज, काठ्याने फोडून वाहनाचे नुकसान केले. जबर मारहाणीमुळे हे तिघे गंभीर जखमी झाले. उमेश नायकिंडे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी अज्ञात दहा ते पंधरा मारहाण, शिवीगाळ, वाहनाची तोडफोड तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल केला.(तालुका प्रतिनिधी)या घटनेनंतर जामखेड येथील काही कार्यकर्त्यांनी स्कॉर्पिओ वाहनातील मारहाणीत जखमी झालेले तिघे जण निघून चालले असता त्यांना खर्डा - भूम रस्त्यावरील शिवूरफाटा येथून परत जामखेड पोलीस ठाण्यात आणले. यावेळी दोन समाजातील लोकांचा जमाव जमला होता. मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी एका गटाने केली. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञात दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे वातावरण निवळले.