गोड बातमी.....कोरनावरील लस अखेर नगरमध्ये दाखल, ३९ हजार डोस मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 01:00 PM2021-01-13T13:00:53+5:302021-01-13T13:01:16+5:30

अहमदनगर: ज्या दिवसाची अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती, तो दिवस आज अखेर उजाडला आहे. कोरोनावरील लस अखेर अहमदनगरमध्ये दाखल झाली आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ही गोड बातमी नगर जिल्ह्याला मिळाली आहे. तब्बल ३९ हजार डोस जिल्हा परिषदेमध्ये आले असून या लसी शीतगृहात ठेवण्यात आल्या आहेत. 

Sweet news ..... The vaccine on Korna has finally arrived in the city, 39,000 doses have been received | गोड बातमी.....कोरनावरील लस अखेर नगरमध्ये दाखल, ३९ हजार डोस मिळाले

गोड बातमी.....कोरनावरील लस अखेर नगरमध्ये दाखल, ३९ हजार डोस मिळाले

Next

अहमदनगर: ज्या दिवसाची अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती, तो दिवस आज अखेर उजाडला आहे. कोरोनावरील लस अखेर अहमदनगरमध्ये दाखल झाली आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ही गोड बातमी नगर जिल्ह्याला मिळाली आहे. तब्बल ३९ हजार डोस जिल्हा परिषदेमध्ये आले असून या लसी शीतगृहात ठेवण्यात आल्या आहेत. 

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून राज्यात सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जात आहे. नगर जिल्हाही लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाला असून जिल्ह्याला ३९ हजार २९० डोस प्राप्त झाले आहेत. या लसीचे डोस जिल्हा परिषदेत शित साखळी उपकरणांमध्ये ठेवण्यात आले असून येथूनच त्याचे जिल्हा शल्य चिकित्सक व मनपा स्तरावर वितरण होणार आहे. जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. दादासाहेब साळुंके यांनी यांच्या निगराणीखाली लसीचा पहिला साठा उतरवून घेण्यात आला व स्टोरेज करण्यात आला आहे.

डॉ. सांगळे यांनी सांगितले की, दि.१३ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता नगर जिल्ह्यासाठी ३९ हजार २९० कोविड १९ लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. राज्य कुटुंब कल्याण केंद्र पुणे या कार्यालयामार्फत हे डोस नगर जिल्ह्याला मिळाले असून ते २ ते ८ डिग्री तापमानात ठेवण्यात आलेले आहेत. राज्यस्तरावरुन केंद्रांची संख्या निश्चित झाल्यानंतर लाभार्थींच्या संख्येनुसार संबंधित केंद्रावर डोसेसचे वितरण केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेतील डोस स्टोरेजसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून याठिकाणी विनित धुंदाळे, गिरीश धाडगे, किरण शेळके, सुनिल सुंबे, इमरान सय्यद या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Sweet news ..... The vaccine on Korna has finally arrived in the city, 39,000 doses have been received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.