शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Sundays Special: नगरचे हिलस्टेशन उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 3:53 PM

मांजरसुंबा येथील उंच हिरव्यागार डोंगरावर उभारण्यात आलेल्या निजामशाहीकालिन मर्दानखाना ही ऐतिहासिक वास्तू देखभाल अभावी मोडकळीस आल्याने अखेरच्या घटका मोजत आहे.

योगेश गुंडकेडगाव : मांजरसुंबा येथील उंच हिरव्यागार डोंगरावर उभारण्यात आलेल्या निजामशाहीकालिन मर्दानखाना ही ऐतिहासिक वास्तू देखभाल अभावी मोडकळीस आल्याने अखेरच्या घटका मोजत आहे. नगरचे हिलस्टेशन असणारा हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठीच्या प्रस्तावावर आता धूळ बसली आहे.हिरव्यागार डोंगरदऱ्यांनी नटलेला हा परिसर समुद्र सपाटीपासून सुमारे २९०० फूट उंचीवर आहे. यामुळेच हा परिसर नगरचे हिलस्टेशन म्हणून आता ओळखला जाऊ लागला आहे. येथील निसर्ग व ऐतिहासिक वास्तूच्या सौंदर्य निरीक्षणाचा आनंद घेण्यासाठी येणाºया पर्यटकांना येथे कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. डोंगरगण व गोरक्षनाथ गड यांच्या मध्यभागी असलेल्या उंच डोंगरावर निजामशाहाच्या काळात बादशहाच्या विश्रांतीसाठी हा देखणा मर्दानखाना महाल बांधण्यात आला. या वास्तूमुळे नगरच्या ऐतिहासिक वैभवात भर पडली आहे. मात्र देखभालीअभावी व लक्ष न दिल्याने या सुंदर वास्तूचे आता पडझड झालेले अवशेष उरले आहेत. भग्नावस्थेत असणारी ही वास्तू पर्यटन विकासापासून वंचित राहिली आहे.निजामशाही सुरक्षित राहावी, परकीय सत्तांचे आक्रमण होऊ नये म्हणून या महालातून टेहळणी केली जात होती. या महालाशेजारी जलविहारासाठी तयार केलेला तलाव, त्यात पाणी भरण्यासाठी हत्ती मोट, स्नानासाठीचा हमामखाना, शाही दरवाजा, चौकी,याच ठिकाणी दावलमलिक दर्गा आहे.मांजरसुंबा ग्रामस्थांनी दोन लाख रूपये खर्चुन महालावर पर्यटकांना जाण्यासाठी रस्ता तयार केला होता. मात्र पावसामुळे या रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. मांजरसुंबा गडावर पॅराग्लायडिंग व ट्रेकिंग करण्यासाठी काही हौशी पर्यटक येत असतात. याच गडावर मराठी चित्रपटाचे चित्रीकरण व अनेक लघुपटाचे चित्रीकरण झाले आहे. सुटीच्या दिवशी अनेक पर्यटक येथे आपली सुटी घालविण्यासाठी आवर्जून भेट देतात. मात्र सुखसुविधा नसल्याने पर्यटकांची मोठी अडचण होते.असा आहे पर्यटन विकासाचा प्रस्तावमांजरसुंबा येथील ऐतिहासिक वास्तूचे व येथील निसर्गाचे सौंदर्य वाढविण्यासाठी सरपंच जालिंदर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी पर्यटनाचा प्रकल्प तयार केला. त्यात पर्यटकांसाठी खेळण्या, बाकडे, झोके, रोपवे, बंधारे, रस्ते असा प्रकल्प तयार केला. त्यास ग्रामवन असे नावही देण्यात आले. हा प्रस्ताव सरकारी दरबारी धूळ खात पडला आहे.

सुशोभीकरणाचा प्रस्ताव धूळ खात पडूनमांजरसुंबा गावाने येथील निसर्ग व ऐतिहासिक महत्त्व ओळखून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथील विकास कामांचा व सुशोभीकरणाचा प्रस्ताव महसूल आयुक्तांकडे पाठवूनही त्यावर कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत.नगरकरांच्या पर्यटनासाठी आम्ही येथील विकासकामांचा प्रस्ताव तयार केला. तो मंजूर झाल्यास येथील ऐतिहासिक वास्तू व निसर्गरम्य वातावरणाचा पर्यटन विकासासाठी फायदा होणार आहे. काही खासगी कंपन्या सुद्धा येथील ऐतिहासिक वास्तूच्या दुरूस्तीसाठी पुढे येत आहेत. मात्र त्यांना मंजुरी मिळत नाही. -जालिंदर कदम, सरपंच ,मांजरसुंबा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर