शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

अहमदनगरमध्ये ऊस दर आंदोलन पेटले : कृषिप्रधान देशात शेतक-यांवर गोळीबार होणं ही काळिमा फासणारी घटना - अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 1:11 PM

शेवगाव येथे पोलिसांच्या गोळीबारात जखमी शेतक-यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली.

अहमदनगर : शेवगाव येथे पोलिसांच्या गोळीबारात जखमी शेतक-यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. कृषिप्रधान देशात शेतकऱ्यावर गोळीबार होणे ही काळिमा फासणारी घटना असून, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी यावेळी अण्णा हजारे यांनी केली.

नेमकी काय घडली घटना?स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांच्या ऊस दर आंदोलनाला बुधवारी (15 नोव्हेंबर ) शेवगाव तालुक्यात हिंसक वळण लागले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर व अ‍ॅक्शन गनच्या सहाय्याने प्लास्टिक बुलेटचा मारा केला. गोळीबारात पैठण तालुक्यातील दोन शेतकरी, तर आंदोलकांच्या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी जखमी झाले. उद्धव विक्रम मापारे (३४) व नारायण भानुदास दुकळे (४५ दोघे, रा़ तेलवाडी, ता़ पैठण) या जखमी शेतक-यांवर नगरला उपचार सुरू आहेत़ उद्धव यांच्या छातीत उजव्या बाजूला छर्रा घुसला आहे.

नगर व औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवरील गंगामाई खासगी कारखान्याने भाव जाहीर केला नव्हता. ३,१०० रुपये भावासाठी खानापूर, घोटण परिसरात शेतक-यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू होते. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरीही त्यात सहभागी होते. आंदोलकांनी वाहने अडविल्याने चार किमीपर्यंत रांगा लागल्या. पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराचाही वापर केला. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड व जाळपोळ केल्याने पोलिसांना प्लॅस्टिक गन वापरावी लागली, असे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले. पैठणमध्येही पोलिसांनी काहींची धरपकड केली.

सोलापुरात रास्ता रोको सोलापूरमध्ये सांगोल्यात ऊसाच्या दरावरून आंदोलकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले. मंगळवेढ्यात रास्ता रोको आंदोलन केले.

बैठकीनंतर शांत झाले शेतकरीघटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे शेवगावमध्ये आले. अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, प्रांताधिकारी विक्रम बांदल व शेतकरी नेत्यांमध्ये सायंकाळी बैठक झाली. त्यानंतर, गंगामाई कारखान्याने २,५२५ रुपये भाव जाहीर केला. बैठकीनंतर आंदोलन स्थगित केल्याचे तुपकर यांनी सांगितले.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेFarmerशेतकरी