शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

यंदा महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन दुपटीने वाढले; पुणे, कोल्हापूर विभाग आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 7:35 PM

७ जानेवारीअखेर राज्यात झालेल्या गाळप व साखर उत्पादनापेक्षा यावर्षी याच तारखेला दुप्पट गाळप व उत्पादन झाले आहे. ७ जानेवारी २०१७ रोजी राज्यात २४०.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

ठळक मुद्दे​​​​​​​गेल्यावर्षी ७ जानेवारीअखेर राज्यात झालेल्या गाळप व साखर उत्पादनापेक्षा यावर्षी याच तारखेला दुप्पट गाळप व उत्पादन झाले आहे. सन २०१६-१७ च्या हंगामात ७ जानेवारी २०१७ रोजी राज्यात २२८.२३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले होते. त्यातून २४०.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते.यावर्षी ४२५.०१ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.७ जानेवारीअखेर प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात ८७ सहकारी व ६२ खाजगी असे १४९ साखर कारखाने सुरू आहेत.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : साखर हंगाम सुरू होऊन सव्वा दोन महिने झाले असताना राज्यात १४९ साखर कारखान्यांच्या माध्यमातून जवळपास साडेचार कोटी क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उता-यात कोल्हापूर विभागाने आपली आघाडी कायम राखताना अव्वल स्थान पटकाविले आहे. तर कधीकाळी राज्यात दबदबा असणा-या अहमदनगर विभागाची थेट चौथ्या स्थानावर घसरण कायम आहे.गेल्यावर्षी ७ जानेवारीअखेर राज्यात झालेल्या गाळप व साखर उत्पादनापेक्षा यावर्षी याच तारखेला दुप्पट गाळप व उत्पादन झाले आहे. सन २०१६-१७ च्या हंगामात ७ जानेवारी २०१७ रोजी राज्यात २२८.२३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले होते. त्यातून २४०.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. याच तारखेला यावर्षी ४२५.०१ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.रविवार ७ जानेवारीअखेर प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात ८७ सहकारी व ६२ खाजगी असे १४९ साखर कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांनी ७ जानेवारीअखेर ४२५.०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार करण्यात आली आहे. जवळपास चार कोटी क्विंटलच्या पुढे राज्यातील साखर उत्पादनाने झेप घेतली आहे. बुधवारपर्यंत हे उत्पादन जवळपास साडेचार कोटी क्विंटलपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के आहे. यात ३७ कारखाने असणारा कोल्हापूर विभाग ११.६२ टक्के उता-यासह राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला. तर राज्यात सर्वाधिक ६१ कारखाने असणारा पुणे विभाग १०.४० उता-यासह दुस-या क्रमांकावर आहे.

विभागनिहाय गाळप साखर उत्पादन

(गाळप मेट्रिक टनामध्ये व उत्पादन क्विंटलमध्ये) पुढीलप्रमाणे :- कोल्हापूर: १०१.४६ लाख (११७.८५ लाख). पुणे १६६.८८ लाख (१७३.५७). अहमदनगर ५९.८९ लाख (५८.५८ लाख). औरंगाबाद ३७.९९ लाख (३३.०७ लाख). नांदेड ५२.८७ लाख (५१.७३ लाख). अमरावती ३.१४ लाख (३.१४ लाख). नागपूर २.७९ लाख (२.५३ लाख).

राज्याचा विभागनिहाय साखर उतारा

कोल्हापूर ११.६२, पुणे १०.४०, अमरावती १०.०२, अहमदनगर ९.७८, नांदेड ९.७८, अमरावती १०.०२, नागपूर १०.३६.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने