शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

साखर @ 13 किलो

By admin | Published: July 16, 2014 11:48 PM

अहमदनगर: दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना अवघ्या १३ रुपयात साखर मिळणार आहे़ नगर जिल्ह्यासाठी पुरवठादारांची बुधवारी आॅनलाईन नियुक्ती करण्यात आली

अहमदनगर: दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना अवघ्या १३ रुपयात साखर मिळणार आहे़ नगर जिल्ह्यासाठी पुरवठादारांची बुधवारी आॅनलाईन नियुक्ती करण्यात आली असून, येत्या जुलैपासून जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना साखरेचा पुरवठा केला जाणार आहे़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकेवरून गायब झालेली साखर पुन्हा मिळणार आहे़शासनाने फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजना सुरू केली़ त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना अत्यल्प दरात धान्य उपलब्ध होत आहे़ स्वस्त धान्य नागरिकांना मिळाले़ परंतु दारिद्रय रेषेखालील नागरिकांना मिळणारी साखर जानेवारीपासून बंद झाली़ धान्य स्वस्त झाले़ पण साखर गायब झाल्याने शिधापत्रिकेचा गोडवा गेला,असे म्हणण्याची वेळ दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांवर आली होती़ ही साखर विधानसभेतही चांगलीच गाजली़ त्यामुळे सरकारला जागा आली असून, तातडीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी आॅनलाईन बोली लावण्यात आली़ त्यास प्रतिसादही मिळाला़ नगर जिल्ह्यासाठीच्या पुरवठादाराची नियुक्ती आॅनलाईन पध्दतीने करण्यात आली असून, संबंधित ठेकेदाराकडून साखरेचा पुरवठा केला जाणार आहे़जिल्हा पुरवठा विभागाकडून पूर्वी साखरेचे वाटप करण्यात येत होते़ मात्र साखर कारखान्यांनी शासनास साखर देण्यास नकार दिला़ त्यामुळे साखरेचा तुटवडा निर्माण झाला़ परिणामी शिधापत्रिकेवरून साखर गायब झाली़ साखरेची मागणी करून देखील दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना साखर मिळत नव्हती़ परंतु आता शासनाने पुन्हा साखरेचा पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन निविदा मागविल्या असून, त्यास प्रतिसाद मिळाला आहे़ संबंधित ठेकेदाराकडून येत्या जुलैपासून संबंधित पुरवठादारामार्फत साखरेचा स्वस्त धान्य दुकानांत पुरवठा केला जाणार आहे़ दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे़ (प्रतिनिधी)साखरेचा पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने आॅनलाईन निविदा मागविल्या होत्या़ नगर जिल्ह्यासाठी बुधवारी आॅनलाईन बोली लावण्यात आली असून, याव्दारे पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे़-सोपान कासार, जिल्हा पुरवठा अधिकारी अशी मिळणार साखरदारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका धारकांना प्रति किलो १३़ ५० दराने साखरेचे वाटप केले जाणार आहे़ प्रति माणसी पाच किलो साखर मिळणार असून, ती सर्व दुकानांत उपलब्ध होणार आहे़तसेच याच दरात अंत्योदय लाभार्थींनाही साखर मिळणार आहे़