गॅसच्या दरवाढीमुळे पुन्हा पेटल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:19 AM2021-04-18T04:19:40+5:302021-04-18T04:19:40+5:30

केडगाव : गॅस खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने, ग्रामीण भागात पुन्हा चुलीचा धूर निघू लागला आहे. घरगुती गॅस ...

Stoves re-lit due to gas price hike | गॅसच्या दरवाढीमुळे पुन्हा पेटल्या चुली

गॅसच्या दरवाढीमुळे पुन्हा पेटल्या चुली

Next

केडगाव : गॅस खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने, ग्रामीण भागात पुन्हा चुलीचा धूर निघू लागला आहे. घरगुती गॅस १४५ रुपयांनी महागल्याने आता गॅस सिलिंडरसाठी ८६५ रुपये मोजावे लागत आहेत.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ग्रामीण भागात घरोघरी गॅस आला. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली. मात्र, गॅसच्या किमतीत अचानक झालेली मोठ्या वाढीमुळे नगर तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत.

ग्रामीण भागातील महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्तता करण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत शंभर रुपयांत घराघरात गॅस पोहोचविला. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला. सध्या सर्व महिला गॅसवरच सगळा स्वयंपाक बनवू लागल्या असताना, दिवसेंदिवस गॅसची भाववाढ सातत्याने सुरू असल्याने ग्रामीण कुटुंबाना गॅस भरणे कठीण झाले. त्यात गेल्या आठवड्यात गॅसचे दर १४६ रुपयांनी वाढले आहेत. कोरोना काळात रोजगार नसल्याने आर्थिक प्रश्नही निर्माण झाला आहे.

...

कोरोना महामारीने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. गुंडेगाव येथे वन विभागाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वाटप केले आहेत. असे असले, तरी गॅस भरण्यासाठी पैसे नसल्याने पुन्हा चुली पेटाव्या लागत आहेत.

- अनिता भापकर, गुंडेगाव, ता.नगर.

..

फोटो-१७चुल

...

गॅस महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीचा धूर निघू लागला आहे. गुंडेगाव येथे चूल पेटविताना महिला.

Web Title: Stoves re-lit due to gas price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.