अपघातानंतर पेटला डंपर; एकाचा होरपळून मृत्यू; नगर-औरंगाबाद रोडवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:29 PM2020-01-19T12:29:01+5:302020-01-19T12:30:57+5:30

खासगी व डंपर अपघातात डंपरमधील एका मजुराचा होरपळून मृत्यू झाला. तर खासगी बसमधील चालकासह आठ प्रवासी जखमी झाले.

Stomach bumper after accident; The death of one; Incident on Nagar-Aurangabad Road | अपघातानंतर पेटला डंपर; एकाचा होरपळून मृत्यू; नगर-औरंगाबाद रोडवरील घटना

अपघातानंतर पेटला डंपर; एकाचा होरपळून मृत्यू; नगर-औरंगाबाद रोडवरील घटना

Next

नेवासा : खासगी व डंपर अपघातात डंपरमधील एका मजुराचा होरपळून मृत्यू झाला. तर खासगी बसमधील चालकासह आठ प्रवासी जखमी झाले. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम येथे रविवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर डंपरला आग लागली होती.
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर कामानीजवळ नगरकडून औरंगाबादकडे जाणाºया खासगी बसने (क्रमांक जी.जे.-१४, झेड-८५८५) डंपरला (विना नंबर) धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपरची डिझेल टाकी फुटून डंपरने पेट घेतला. दरम्यान डंपरमध्ये असलेला मजूर पांडुरंग रामकिसन गायकवाड (वय २७, रा. प्रवरासंगम, ता.नेवासा) हा या अपघातात डंपरमध्येच जळून मयत झाला आहे. तर  डंपर चालक अशोक शिंदे, ट्रॅव्हल्स चालक मोहन थावरा राठोड (रा.वडहुळी, ता.जिंतूर, जि.परभणी), संतोष धोंगडे व इतर सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातमध्ये डंपर पूर्णपणे जाळून खाक झाला आहे. तर  खासगी बसचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. 
अपघातानंतर वाहतूक ठप्प
अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भारत दाते, पोलीस नाईक बबन तमनर व पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. मयत पांडुरंग गायकवाड याचा भाऊ शहादेव रामकिसन गायकवाड याने खासगी चालकाविरुद्ध नेवासा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. 

Web Title: Stomach bumper after accident; The death of one; Incident on Nagar-Aurangabad Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.