Shrirampura police custody accused with beds of smoke | श्रीरामपुरात पोलिसांच्या ताब्यातील आरोपीची बेड्यांसह धूम
श्रीरामपुरात पोलिसांच्या ताब्यातील आरोपीची बेड्यांसह धूम

श्रीरामपूर : येथील ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन धूम ठोकली. त्यामुळे रुग्णालयात मोठी धावपळ उडाली. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारत आरोपी पसार झाला. 
फरार झालेल्या आरोपीचे नाव राहुल गणेश शिंदे (वय २०) असे आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान तो बेड्यांसह पसार झाला. यावेळी तिघा पोलीस कर्मचा-यांनी त्याला वैैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. तपासणी झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातून त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारत पळ काढला. यावेळी पोलिसांसमवेत रुग्णालय कर्मचारीही त्याच्या मागे पळाले. शिरसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो पळाला. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांची कुमक दाखल झाली.
  शहरातील खिलारी वस्ती भागात नुकताच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेतील तो आरोपी आहे. त्याच्यावर प्रारंभी मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्याकडे आहे. त्यांना याबाबत विचारणा केली असता आरोपी पळाल्याच्या घटनेला त्यांनी दुजोरा दिला. मात्र वैैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या पोलीस कर्मचा-यांची नावे देण्यास त्यांनी नकार दिला. आपण आरोपीच्या शोधासाठी चाललो आहोत. त्यानंतर सविस्तर माहिती देऊ असे ते लोकमतशी बोलताना म्हणाले.

Web Title: Shrirampura police custody accused with beds of smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.