शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

श्रीगोंद्याच्या चार मुलींची खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:09 PM

श्रीगोंदा येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिला कुस्तीची दंगल सुरू झाली आहे. यंदा या केंद्रातील चार मुलींची मुलींची खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिला कुस्तीची दंगल सुरू झाली आहे. यंदा या केंद्रातील चार मुलींची मुलींची खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या मुली आसाम राज्यात होणा-या खेलो इंडिया २०२० ही कुस्ती स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.श्रीगोंदा तालुक्यात पैलवान घडविण्यासाठी स्व. कुंडलिकराव जगताप, स्व. अण्णा पाटील पवार, स्व. बलभिम जगताप, स्व. बबनराव शेळके, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, देवा शेळके यांच्यासह अनेकांनी योगदान दिले. निंबवीचे मेजर अशोक शिर्के यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला, तर संदीप बारगुजे उपमहाराष्ट्र केसरी ठरले. काष्टीचा अजय रंधवे हा नॅशनल चॅम्पीयन मल्ल ठरला. आढळगावच्या सुपुत्राने कर्नाटकचे मैदान गाजविले. सध्या मुलांची कुस्तीत उदासीनता दिसते. गावोगावच्या तालमी बंद पडल्या आहेत. काही ठिकाणी कुस्ती यात्रेतील आखाड्यापुरतीच शिल्लक राहते की काय अशी भीती आहे. मात्र अशा परिस्थितीत केंद्रीय सुरक्षा दलातील पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत फंड यांनी भाग्यश्री व धनश्री या त्यांच्या लेकींनी कुस्तीत करिअर करावे यासाठी पाउल टाकले. भाग्यश्रीने आंतरराष्ट्रीयस्तरावर मजल मारली. त्यांच्यासह इतर मुलींनाही कुस्तीचे प्रशिक्षण मिळावे यासाठी फंड यांनी नोकरी सोडून  मार्च २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षण केेंद्राचा कुस्ती प्रशिक्षक किरण मोरे यांना बरोबर घेऊन श्रीगणेशा केला. त्यांच्याबरोबरच पूजा फंड यांनी मुलींच्या आहाराकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे श्रीगोंद्याच्या मातीत महिला कुस्तीची नवी दंगल सुरू झाली.या केंद्रात राज्यभरातून ३२ मुली दाखल झाल्या आहेत. यातीलच भाग्यश्री फंड (श्रीगोंदा), सोनाली मंडलिक (कर्जत), धनश्री फंड (श्रीगोंदा), पल्लवी पोटफोडे (दौंड) या मुलींची जानेवारी महिन्यात सोनापूरमध्ये (आसाम) होणा-या खेलो इंडियातील कुस्ती स्पर्धेसाठी वेगवेळ्या वजन गटात निवड झाली आहे. याशिवाय साक्षी मावळे (पारनेर), पायल मरागजे (मुंबई), सृष्टी येवले (पुणे), साक्षी इंगळे (मुंबई) व कामीनी देवीकर (श्रीगोंदा) यांनी राज्यपातळीवर यश मिळविले आहे.      

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKhelo India 2019खेलो इंडिया 2019