शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 7:04 PM

राजूर:भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी दिवसभराच्या बारा तासांत भंडारदरा येथे तब्बल ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आणि धरणात 357 दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा सुमारे 78 टक्के झाला. धरण परिसरात असाच पाऊस कोसळत राहिल्यास तीन दिवसांत भंडारदरा धरण भरण्याची शक्यता आहे.दरम्यान भंडारदरा धरणातून वीज निर्मिती साठी ८३५ कुसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

 

राजूर : भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी दिवसभराच्या बारा तासांत भंडारदरा येथे तब्बल ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आणि धरणात 357 दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा सुमारे 78 टक्के झाला. धरण परिसरात असाच पाऊस कोसळत राहिल्यास तीन दिवसांत भंडारदरा धरण भरण्याची शक्यता आहे.दरम्यान भंडारदरा धरणातून वीज निर्मिती साठी ८३५ कुसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

    बुधवारी रात्री पासून पाणलोट क्षेत्रास साजेसा पावसास सुरुवात झाली. गुरुवारी  सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे साडे सहा इंचाहून अधिक तर रतनवाडी,पांजरे भंडारदरा येथे सुमारे पाच इंच पावसाची नोंद झाली. 

मागील आठवड्या पासून मुळा,भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची सतत धार सुरूच होती. असे असतानाच बुधवारी रात्रभर परिसरात जोरदार पावसाच्या सरी बरसू लागल्या.गुरुवारी सकाळ पासून मुसळधार सरी बरसत आहेत.यामुळे परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले असून धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.

    गुरुवारी भंडारदरा परिसरात दिवसभर धो धो पाऊस कोसळत होता. दिवसभराच्या बारा तासांत येथे ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.धरणात संपलेल्या गुरुवारी सायंकाळी सहा वाजता संपलेल्या ३६ तासांत चोवीस तासांत ८७६ दशलक्ष घनफुट नविन पाण्याची आवक होत पाणीसाठा ८ हजार ५८७ दशलक्ष घनफुटा पर्यंत पोहचला होता.       दरम्यान कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांतही पावसाचा जोर कायम आहे.त्यातच निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.वाकी येथील लघु पाटबंधारे तलावा वरून पाणी प्रवरेची उपनदी समजल्या जाणाऱ्या कृष्णावंती नदीपात्रात १हजार२२ कुसेक्सने पाणी झेपावत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.निळवंडे धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी सहा वाजता ५ हजार १४ दशलक्ष घनफुट झाला होता.

       गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस मिलिमीटर मध्ये पुढील प्रमाणे ,कंसात या मोसमात नोंदला गेलेला पाऊस.घाटघर १६५(३१२८), रतनवाडी १५५(२३६०) ,पांजरे १४५(२०१४) तर भंडारदरा येथे १४० (१७२२)मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

 हरिश्चंद्र गडाच्या परिसरातील पर्वत रांगांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने कोतुळ जवळील मुळेच्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.यामुळे या मोसमात पहिल्यांदा मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे.गुरुवारी सकाळी हा विसर्ग १४ हजार कुसेक्सहून अधिक म्हणजेच १४ हजार ३२२कुसेक्स इतका होता. यामुळे मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक वाढली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरण