पारनेर मतदारसंघात शिवसेना-राष्ट्रवादीत बंडखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 02:26 PM2019-10-03T14:26:43+5:302019-10-03T14:26:52+5:30

 पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहेत. असे असताना दोन्ही पक्षातून बंडखोरी झाली असल्याने तेथे तिसरी आघाडी उदयास येण्याची शक्यता आहे.

Shiv Sena-Nationalist uprising in Parner constituency | पारनेर मतदारसंघात शिवसेना-राष्ट्रवादीत बंडखोरी

पारनेर मतदारसंघात शिवसेना-राष्ट्रवादीत बंडखोरी

Next

पारनेर :  पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहेत. असे असताना दोन्ही पक्षातून बंडखोरी झाली असल्याने तेथे तिसरी आघाडी उदयास येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने आमदार विजय औटी व राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांनी गुरुवारी उमेदवारी आपापले अर्ज दाखल केले आहेत. सेनेने विजय औटी यांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेले सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी एकत्र येऊन आघाडी केली आहे. या आघाडीत सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांचाही समावेश आहे. नगर तालुक्यातही हराळ यांच्यासह शिवसेनेने तिसºया आघाडीचा प्रयोग केला होता. त्याचीच पुनरावृत्ती पारनेर मतदारसंघात होताना दिसते आहे.
या तिसºया आघाडीतून कोण अर्ज भरणार, याची उत्सुकताल आहे. तिसरी आघाडी झाली तर नेमका फायदा आणि तोटा कोणाला होणार, याच्या चर्चाही मतदारसंघात रंगल्या आहेत.

Web Title: Shiv Sena-Nationalist uprising in Parner constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.