शिर्डी संस्थान विश्वस्त निवडीच्या नवीन नियमावलीलाही आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:53+5:302021-07-31T04:22:53+5:30

दरम्यान, साईबाबा संस्थानवर सध्या कार्यरत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या नियुक्तीलाही खंडपीठात आव्हान देण्यात आलेले आहे. संस्थानवर ...

Shirdi Sansthan also objected to the new rules for selection of trustees | शिर्डी संस्थान विश्वस्त निवडीच्या नवीन नियमावलीलाही आक्षेप

शिर्डी संस्थान विश्वस्त निवडीच्या नवीन नियमावलीलाही आक्षेप

Next

दरम्यान, साईबाबा संस्थानवर सध्या कार्यरत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या नियुक्तीलाही खंडपीठात आव्हान देण्यात आलेले आहे. संस्थानवर सरळ सेवेने ‘आयएएस’ झालेला अधिकारीच मुख्य कार्यकारी अधिकारी असावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. बगाटे हे पदोन्नतीने आयएएस केडरमध्ये आलेले आहेत. सरळ सेवेने नियुक्त झालेल्या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करा असा आदेश देऊन चार महिने झाले तरी सरकारने त्याचे पालन न केल्याने उत्तमराव शेळके यांनी सामान्य प्रशासन व विधी आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिवांविरोधात अवमान याचिकाही दाखल केली आहे. या अवमान याचिकेवर कार्यवाही करण्यासाठी शासनाने १७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितली आहे. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर.एन. लड्डा यांचे खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे, संस्थानच्या वतीने ॲड. ए. एस. बजाज, तर शासनाच्या वतीने ॲड. डी. आर. काळे काम पाहत आहेत.

Web Title: Shirdi Sansthan also objected to the new rules for selection of trustees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.