शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

साई जन्मस्थळाच्या वादावरून आजपासून शिर्डी बंद ग्रामसभेत निर्णय : साई मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:09 PM

शिर्डी : साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरून शिर्डी शहर शनिवारी मध्यरात्रीपासूनच बेमुदत बंद राहणार आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर भाविकांसाठी उघडे राहणार असून शहरातील दुकाने, बाजार बंद राहणार आहे. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत.

शिर्डी : साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरून शिर्डी शहर शनिवारी मध्यरात्रीपासूनच बेमुदत बंद राहणार आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर भाविकांसाठी उघडे राहणार असून शहरातील दुकाने, बाजार बंद राहणार आहे. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत.साईबाबा जन्मस्थळाचे पाथरीसह आठही दावे तथ्यहीन व भाविकांची दिशाभूल करणारे आहेत़  पाथरीला निधी देण्यास विरोध नाही, मात्र जन्मस्थळाच्या उल्लेखाला तीव्र आक्षेप आहे.़ मुख्यमंत्री आपले विधान मागे घेत नाहीत, तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंद करण्याचा निर्णय  शिर्डीतील ग्रामसभेत घेण्यात आला़  द्वारकामाई मंदिराच्यासमोर झालेल्या व लक्ष्मीबाई शिंदे यांचे नातू सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिर्डी व पंचक्रोशीतील हजारो नागरिक व साईभक्त उपस्थित होते. साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या वंशजांनीही साईबाबांच्या जन्म, गाव, जात, धर्माबद्दल आमच्या पुर्वजांनाही काही माहिती नव्हती, असे सांगितले़ यात तात्या कोतेंचे नातू मुकुंदराव कोते, नंदलाल मारवाड्याचे वंशज दिलीप संकलेचा, म्हाळसापतीचे पणतू दीपक नागरे, अब्दुल बाबाचे पणतू गणीभाई पठाण, भागोजी शिंदेचे पणतू सचिन शिंदे आदींचा समावेश होता़. साईबाबांनी आपला जात, धर्म सांगितला नाही़ साईसच्चरित्रातही त्याचा उल्लेख नाही. आम्हालाही कधी आमच्या पुर्वजांनी सांगितला नाही़ त्यामुळे पाथरीसह सर्वच जन्मस्थळाच्या दाव्याला आपला तीव्र विरोध असल्याचे वंशजांनी सांगितले़राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तींनाही चुकीची माहिती देऊन बाबांच्या जन्मस्थळाच्या रूपाने वाद उपस्थित करण्यामागे षड्यंत्र असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला़ पाथरीला निधी देण्यास मुळीच आक्षेप नाही. मात्र त्याला जन्मस्थळाची ओळख नको. साईबाबांची समाधी होऊन १०१ वर्षे झाली. त्यानंतर हा वाद उपस्थित करण्यात आला़  वारंवार साईबाबांच्या बाबत वाद उभे करण्यात येतात. यामागे षड्यंत्र असल्याची शंकाही ग्रामसभेत उपस्थित  करण्यात आली़ मुख्यमंत्र्यांना कदाचित चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांनी जन्मस्थळाचा उल्लेख केला़  याबाबत त्यांनी तत्काळ खुलासा करावा व भाविकांचा संभ्रम व संताप दूर करावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. ----------मुख्यमंत्र्यांनी विधान मागे घ्यावे- विखेमुख्यमंत्र्यांनी साई जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्यावे. यातून करोडो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर फुंकर घालावी, असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्निवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले़ विखे म्हणाले, जन्मस्थळाबाबत जे दावे केले जातात. त्याला पाठबळ देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करू नये. या संदर्भात शासन समिती नेमण्याच्या विचारात आहे. त्यास आपला पूर्ण विरोध असून त्याची आवश्यकताच नाही. साईबाबांनी कधी जात- धर्म सांगितला नाही. साईसच्चरित्रातही तसा उल्लेख नाही़ अनेक प्रयत्न करून तो ब्रिटिशांनाही शोधता आला नाही़ त्यामुळे ते जगभर सर्वधर्म समभावाचे प्रतिक बनले आहेत़ पाथरीला निधी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र तो जन्मस्थळाच्या नावाने देऊ नये. ---साई मंदिर सुरू, मार्केट बंदबंद काळात साईमंदिर, प्रसादालय, भक्तनिवास, रूग्णालये, मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत़ तर हार-फुलांची व अन्य दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी बंद राहणार आहे़--