शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

हनीट्रॅपचा पर्दाफाश; ती श्रीमंतांना जाळ्यात ओढायची अन् विडीओ बनवून खंडणी मागायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 8:25 PM

श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून अश्लील व्हिडिओ बनवत एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदारास नगर तालुका पोलिसांनी शनिवारी जेरबंद केले. अमोल सुरेश मोरे (३०, रा. कायनेटिक चौक, अहमदनगर) असे अटक केलेल्या सदर महिलेच्या साथीदाराचे नाव आहे.

अहमदनगर: श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून अश्लील व्हिडिओ बनवत एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदारास नगर तालुका पोलिसांनी शनिवारी जेरबंद केले. अमोल सुरेश मोरे (३०, रा. कायनेटिक चौक, अहमदनगर) असे अटक केलेल्या सदर महिलेच्या साथीदाराचे नाव आहे.

नगर तालुक्यातील जखणगाव येथे ३० वर्षीय आरोपी महिला एकटीच राहते. तिने नगर तालुक्यातील एका श्रीमंत व्यावसायिकास शरीरसंबंधाचे आमिष दाखवून २६ एप्रिल रोजी घरी बोलाविले. यावेळी सदर व्यावसायिकास शरीरसंबंध करण्यास भाग पाडून अमोल मोरे यांच्या मदतीने त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. व्हिडिओ तयार होताच आरोपींनी आम्हास एक कोटी रुपये आणून दे नाहीतर सदर व्हिडिओ हा पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. यावेळी आरोपींनी त्या व्यावसायिकास दोरीने बांधून मारहाण करून त्याच्याकडील ५ तोळे वजनाची सोन्याची चेन, चार अंगठ्या व रोख रक्कम ८४ हजार रुपये असा एकूण ५ लाख ४४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. या घटनेनंतर घाबरून गेलेल्या सदर व्यावसायिकाने सुरुवातीस मौन बाळगले; मात्र सदर महिलेचा त्रास असह्य झाल्यानंतर त्याने नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर सानप यांच्या पथकाने शनिवारी सकाळीच जखणगाव येथून सदर महिलेला अटक केली तर अमोल मोरे याला कायनेटिक चौक येथून त्यांच्या राहत्या घरातून अटक करत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

सदर महिलेने व्यावसायिकाकडून हिसकावून घेतलेली चेन तिने भिंगार अर्बन बँक येथे तिच्या भावाच्या नावाने गहाण ठेवली होती. झडती दरम्यान पोलिसांनी सदर महिलेच्या घरातून गुन्ह्यातील एक अंगठी व रोख ६९ हजार ३०० रुपये जप्त केले आहेत. तसेच अमोल मोरे याच्याकडून १५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व पथकातील उपनिरीक्षक आर.एन. राऊत, हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे, भगवान गांगडे, शैलेश सरोदे, संतोष लगड, योगेश ठाणगे, अशोक मरकड, धर्मनाथ पालवे, प्रमिला गायकवाड, धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, गायत्री धनवडे, मोहिनी कर्डक, राजश्री चोपडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महिलेच्या जाळ्यात अनेक जण अडकल्याची शक्यता

सदर महिला व तिचा साथीदार अमोल मोरे यांनी हनीट्रॅपच्या माध्यमातून अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे लाटल्याचा पोलिसांचा संशय आहे. अशा पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी भीती न बाळगता नगर तालुका पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसCrime Newsगुन्हेगारी