Security guard arrested for murdering supervisor | सुपरवायझरचा खून करणा-या सुरक्षा रक्षकाला अटक
सुपरवायझरचा खून करणा-या सुरक्षा रक्षकाला अटक

अहमदनगर : एमआयडीसीतील क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली. 
किरण रामभाऊ लोमटे (मूळ रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लोमटे याने राजाराम नामदेव वाघमारे (वय ५०, रा. भिंगार) यांचा खून केला होता. यावेळी सुरक्षारक्षक अनिल उमाप यांच्यावरही लोमटे याने कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले होते. या घटनेनंतर उमाप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोमटे याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. शुक्रवारी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे यांच्या पथकाने आरोपीस अटक केली. 

Web Title: Security guard arrested for murdering supervisor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.