शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

सायबर पोलीस उलगडणार ‘त्या सात घटनांचे रहस्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 7:40 PM

मागील एक ते दीड वर्षात जिल्ह्यात विविध ठिकाणी समोर आलेल्या आठ घटनांमध्ये दहा जणांचा खून झाला असून, स्थानिक पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करता आलेला नाही. या गुन्ह्यांचे आता सायबर पोलिसांच्या मदतीने रहस्य उलगडण्यात येणार आहे.

अहमदनगर : मागील एक ते दीड वर्षात जिल्ह्यात विविध ठिकाणी समोर आलेल्या आठ घटनांमध्ये दहा जणांचा खून झाला असून, स्थानिक पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करता आलेला नाही. या गुन्ह्यांचे आता सायबर पोलिसांच्या मदतीने रहस्य उलगडण्यात येणार आहे.या आठ घटनांचा सायबर पोलिसांकडे तपास दिल्यानंतर चार दिवसांतच राहुरी येथील तरूणाच्या खुनाचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी आरोपीला अटक केली. उर्वरित सात गुन्ह्यांचा तपासही सायबर पोलिसांनी सुरू केला आहे. २०१७ या वर्षात तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत कल्याण बायपास रोडवर एका जळालेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह आढळला. या मृतदेहाची ओळख पटलेली नाही़ कर्जत तालुक्यातील दूरगावमधील जंगलात एक महिला व दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले होते. तपास करून या मृतांची ओळख पटलेली नसल्याने तपास रखडलेला आहे. नगर शहराजवळील केकताईच्या डोंगरात दोन साधुंची जाळून हत्या झाली. या घटनेचे रहस्य अजून समोर आलेले नाही. तीन महिन्यापूर्वी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अकोळनेर रोडवर एका तरूणाचा जाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचीही अजून ओळख समोर आलेली नाही. राहुरी येथे एका महिलेचा मृतदेह आढळला. लोणी येथे दरोड्याच्या घटनेत वृद्ध महिलेचा खून झाला असून, या गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. सुपा पोलीस ठाणे हद्दीतही झालेल्या खुनाचे रहस्य अजून कायम आहे. या आठ घटनांमध्ये दहा जणांचा खून झाल्याचे समोर आले आहे. यातील राहुरी येथील तरूणाचे खुनाचे रहस्य उलगडले असून, उर्वरित सात घटनांचा तपास करण्याचे आवाहन सायबर पोलीस ठाण्यासमोर आहे.

मृतदेहाची ओळख पटलेली नाही

कर्जत, कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत पाच जणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे. या मृतदेहांची ओळख अजून समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनांचा तपासही ठप्प आहे. आता गुन्ह्यांचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर राहणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस