श्रीगोंद्यातील वाईन शॉप केले सील; फिजीकल डिस्टसिंगचा फज्जा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 01:37 PM2020-05-12T13:37:26+5:302020-05-12T13:38:10+5:30

 जिल्हाधिका-यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सत्यम वाईन शॉप मंगळवारी दुपारी छापा टाकून सील केले.

Sealed the wine shop in Shrigonda; The fuss of physical dissection | श्रीगोंद्यातील वाईन शॉप केले सील; फिजीकल डिस्टसिंगचा फज्जा 

श्रीगोंद्यातील वाईन शॉप केले सील; फिजीकल डिस्टसिंगचा फज्जा 

googlenewsNext

श्रीगोंदा :  जिल्हाधिका-यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सत्यम वाईन शॉप मंगळवारी दुपारी छापा टाकून सील केले.
 सत्यम वाईनसमोर मोठी तळीरामाची रांग लागली होती. फिजीकल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. दारू घेणा-या ग्राहकांची नोंद नव्हती. थर्मल स्कॅनर नव्हते. शेजारी राहणा-या नागरिकांनी आम्हाला त्रास होतो, अशा तक्रारी केल्या होत्या. याबरोबरच काही इलेक्ट्रॉनिक मोबाईल शॉपी बंद करण्यात आल्या. जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य दुकाने सुरु झाल्याने शहरात गर्दी वाढली आहे. संचारबंदी व जमावबंदीची कशी अंमलबजावणी करावी? हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. या पथकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक दिलीप मोटे आदी सहभागी झाले आहेत.

Web Title: Sealed the wine shop in Shrigonda; The fuss of physical dissection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.