शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

भानसहिवरे येथील शेतकरी उसाच्या शेतीतून बनला शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 2:36 PM

पायजमा, नेहरू शर्ट, डोक्यात टोपी अन् गळ्यात उपरणे अशा पोषाखातील शेतकरी गेल्या १६ वर्षापासून ऊस शेतीवर संशोधन करीत आहे. साधे राहणीमान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने ८६०३२ या वाणावर संशोधन करून इशुदंडू ज्ञानेश्वर-१६ हा उसाचा वाण तयार केला आहे.

भाऊसाहेब येवलेराहुरी : पायजमा, नेहरू शर्ट, डोक्यात टोपी अन् गळ्यात उपरणे अशा पोषाखातील शेतकरी गेल्या १६ वर्षापासून ऊस शेतीवर संशोधन करीत आहे. साधे राहणीमान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने ८६०३२ या वाणावर संशोधन करून इशुदंडू ज्ञानेश्वर-१६ हा उसाचा वाण तयार केला आहे. निसर्गातील होणाऱ्या बदलाचा आधार घेत ज्ञानेश्वर निसर्ग केंद्रीत पीक संशोधन केंद्रात तयार केलेल्या वाणाने राज्यभर नावलौकिक मिळविला आहे. मूळ वाणातील दोष घालवून शेतकºयांना दर्जेदार वाण भानसहिवरे येथील शेतकरी विश्वनाथ चव्हाण यांनी दिले आहे.चार्लस् डार्वीन यांच्या उत्क्रांतीवाद सिध्दांताचा विश्वनाथ चव्हाण यांनी अभ्यास केला. १६ वर्षाच्या अथक प्रयत्नातून १६ उतीत परिवर्तन करण्यात आले. देशातील संशोधन कें द्रात संशोधन झाल्यानंतर विविध जाती शेतक-यांच्या शेतावर येतात़ दोन वर्षानंतर शेतक-यांना त्याचे फायदे तोटे समजतात. शेतक-यांच्या फायद्याच्या दृष्टीने विश्वनाथ चव्हाण यांनी ८६०३२ या वाणातील असलेले दोष घालविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यातून तयार झालेला परिपूर्ण ज्ञानेश्वर-१६ हा वाण वरदान ठरत असल्याचे आढळून येत आहे.केवडा रोग येत असे. तो घालविण्यात विश्वनाथ चव्हाण यांना यश आले आहे. गवताळ वाढ सुरूवातीला होत असे. तो दोषही संशोधनातून दूर करण्यात आला. पडणारी काळी कानी दोष दूर करण्यात यश आले. तुरा येत होता तो दोष घालविला. संशोधनातून विश्वनाथ चव्हाण यांना आढळले की, २५ महिन्यात देखील उसाला तुरे आले नाहीत. कांड्याला कॅ्रक पडत असे़ कॅ्रक पडण्याचाही दोष घालविण्यात आला़ उसाच्या पानाची जाडी व रूंदी वाढविण्यात यश आले़ दर्जेदार उसातून दर्जेदार रसाची निर्मिती करणे शक्य झाले. साडेबारा टक्क्यावरून उतारा १४ टक्क्यांवर नेण्यात चव्हाण यांना यश आले आहे.एका डोळ्यापासून तयार झालेल्या उसाला ३० ते ४० फुटवे निर्माण करणे विश्वनाथ चव्हाण यांना अथक प्रयत्नातून शक्य झाले आहे. रासायनिक खताचा वापर न करता उसाचे उत्पादन ६० टनावरून १६३ टनापर्यंत नेण्यात चव्हाण यांना यश आले आहे. चव्हाण यांना पंजाबराव कृषिरत्न पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहे. शंभरपेक्षा अधिक गौरवपत्रही मिळाले आहे. कृषी विद्यापीठ, ऊस संशोधन केंद्र व साखर कारखान्यांनीही चव्हाण यांच्या संशोधनाची दखल घेतली आहे़ केवळ ऊस संशोधनावरच विश्वनाथ चव्हाण थांबलेले नाहीत. त्यांनी रामफळ, पपई, गिन्नी ग्रास, लसून घास आदी १३ पिकांवर संशोधन केले आहे़ राज्यभरातील शेतक-यांना हवे असलेले वाण उपलब्ध करून दिले आहेत. वयाच्या पासष्टीतही विश्वनाथ चव्हाण यांचे शेतक-यांसाठी सुरू असलेले संशोधन प्रेरणादायी आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी