लिंगदेव येथील संगीत आखाडी यंदाही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:54+5:302021-04-12T04:19:54+5:30

अकोले : अनादि काळापासून चालत आलेल्या गुढीपाडव्याच्या संगीत आखाडी (बोहडा) परंपरेचे जतन तालुक्यातील लिंगदेव गावात पुरोगामी विचारांची सांगड घालून ...

Sangeet Akhadi at Lingdev canceled this year too | लिंगदेव येथील संगीत आखाडी यंदाही रद्द

लिंगदेव येथील संगीत आखाडी यंदाही रद्द

Next

अकोले : अनादि काळापासून चालत आलेल्या गुढीपाडव्याच्या संगीत आखाडी (बोहडा) परंपरेचे जतन तालुक्यातील लिंगदेव गावात पुरोगामी विचारांची सांगड घालून केले जाते. कोरोना संकटामुळे यंदा दुसऱ्या वर्षीही संगीत आखाडी रद्द करण्यात आली आहे; मात्र कोरोना प्रतिबंध नियम पाळून अभिषेक, पूजा धार्मिक विधीने लिंगेश्वर गुढीपाडवा मंगळवारी साजरा होणार आहे. लिंगेश्वर महादेव, दत्त महाराज, नव्या सहा मूर्ती यांच्या पुढील नंदादीप यासाठी गोडेतेल, अभिषेक पूजा, वस्र

अलंकार चढविणे, महाआरती याचा मान मिळविण्याच्या लिलाव बोलीतून देवस्थानला २ लाख १५ हजार १११ रुपये उत्पन्न यंदा मिळाले आहे. भ्रमणध्वनीवरून ही लिलाव बोली प्रक्रिया पार पडली, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्राचार्य डी. बी. फापाळे यांनी दिली आहे.

८५ हजार रुपयांना लिलाव बोलीतून ऋषिकेश हाडवळे यांनी महाआरतीचा मान मिळविला आहे. चैत्र गुढीपाडव्याला फक्त धार्मिक विधी होणार आहेत. लेझीम, दंडवते, बोहडा हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यात्रेसाठी कोणीही दुकानदाराने अथवा यात्रेकरूने येऊ नये, असे ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.

राज्यात बोटावर मोजण्या इतक्या गावात आखाडी लोककला जोपासली जाते. दशावतारातील सोंगाची पावले थिरकतात आणि पारंपरिक ‘संगीत आखाडीने’ चैत्र पाडव्याचा लिंगेश्वर महादेव यात्रा उत्सव साजरा होतो. बोहड्यातील सोंगे गावकरी भक्तिभावाने नाचवितात, रामायण-महाभारत व पुराणकथेतील दृश्ये प्रवेश पात्रातून सादर करतात. विष्णू पुराण, दशावतार, बाणी, शेंडी नक्षत्र, सत्यवान-सावित्री, भक्त प्रल्हाद-हिरण्यकश्यपू, राम-रावण, त्राटिका, इंद्रजित युद्ध, भीम-बकासूर आदी नाट्य प्रवेश सादर करून पौराणिक कथा समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम लिंगदेवकर शेकडो वर्षांपासून करत आहेत. यंदा दुसऱ्या वर्षीही गुढीपाडव्याची संगीत आखाडी परंपरा कोरोनामुळे खंडित होणार आहे.

...

११ अकोले आखाडी

Web Title: Sangeet Akhadi at Lingdev canceled this year too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.