शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

संभाजी ब्रिगेडची श्रीगोंद्यात साखरेविरुद्ध भाकरीची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 11:38 AM

‘साखरेविरुद्ध भाकरीची लढाई’ असा नारा देत संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीत उतरली आहे. टिळक भोस यांनी ऊस उत्पादकांच्या थकबाकीसाठी गत ७९ दिवसांपासून बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरु  केले आहे. आता त्यांनी थेट निवडणुकीतच पाचपुते यांना आव्हान दिले आहे. 

श्रीगोंदा : ‘साखरेविरुद्ध भाकरीची लढाई’ असा नारा देत संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीत उतरली आहे. टिळक भोस यांनी ऊस उत्पादकांच्या थकबाकीसाठी गत ७९ दिवसांपासून बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरु  केले आहे. आता त्यांनी थेट निवडणुकीतच पाचपुते यांना आव्हान दिले आहे. श्रीगोंदा मतदारसंघात पाचपुते यांच्याविरोधात राष्टÑवादीकडून उमेदवारी कोण करणार? याची मोठी चर्चा रंगली. नागवडे यांची भूमिका भाजपला अनुकूल असल्याचे समजताच राहुल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. नागवडे यांनीही दोन्ही काँग्रेसकडून उमेदवारी केली नाही. त्यामुळे ऐनवेळी घनश्याम शेलार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. अनुराधा नागवडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, त्या रिंगणात राहतील की नाही हे नक्की नाही. त्यांनी माघार घेतल्यास पाचपुते व शेलार हे प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात राहतील.  या सर्वांना पर्याय म्हणून भोस हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीतही उमेदवार उभे केले होते. तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या थकीत पेमेंटबाबत एकही नेता बोलत नाही. पाणी, रोजगार, फळबागा याचा प्रश्न आहे. यावर्षी अनेक शेतक-यांना चारा छावणीत दिवस काढावे लागले. टँकरचे पाणी प्यावे लागले. या मुद्यांकडे ते गावोगावच्या सभांमधून लक्ष वेधत आहेत. आम्ही साखर कारखानदार नाहीत. आमच्याकडे पैसा नाही. आमची लढाई भाकरीची आहे, अशी भूमिका घेऊन ते मैदानात उतरले आहेत. श्रीगोंदा तालुका प्रस्थापित नेत्यांनी वेठीस धरला आहे. हे नेते नेहमी वैयक्तिक हितासाठी तडजोडी करतात. जनतेला यांनी गृहित धरले आहे. त्यामुळे सामान्य शेतक-याचा मुलगा व जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडणुकीत उतरलो आहे, असे संभाजी ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर