विसाव्या वर्षी यज्ञ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:19 AM2021-01-17T04:19:43+5:302021-01-17T04:19:43+5:30

शिर्डी : येथील साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्री साईलक्ष्मी यज्ञ यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी व शर्ती ...

Sacrifice in the twentieth year | विसाव्या वर्षी यज्ञ उत्साहात

विसाव्या वर्षी यज्ञ उत्साहात

Next

शिर्डी : येथील साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्री साईलक्ष्मी यज्ञ यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी व शर्ती राखत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यज्ञाचे हे विसावे वर्ष होते. श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने दरवर्षी श्री साईलक्ष्मी यज्ञ केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अटी व शर्तीचे पालन करत यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय लक्ष्मीबाई शिंदे यांची नात शैलजा शिंदे- गायकवाड व गायकवाड परिवारातर्फे गेल्या वीस वर्षांपासून श्री साईलक्ष्मी यज्ञाचे आयोजन करण्यात येते. ती परंपरा यावर्षी ट्रस्टचे विश्वस्त अरुण गायकवाड, संगीता गायकवाड, साईराज गायकवाड व भक्तपरिवाराने कायम राखली. याप्रसंगी जितेंद्र शेळके, अजित पारख, नगरसेवक अशोक गोंदकर, अमित शेळके, काकासाहेब कोते, जितेश लोकचंदानी, साईराज गायकवाड, यशराज गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Sacrifice in the twentieth year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.