शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

परळीत माझं काही खरं नाही ही अफवा-पंकजा मुंडे; पाथर्डीत राजळेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 6:02 PM

परळीमध्ये माझं काही खरं नाही ही अफवा आहे. पंतप्रधान मोदींना प्रचारासाठी यावे लागले, असे आमचे विरोधक म्हणतात. स्व.मुंडेंसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी, राजनाथसिंह आले होते. आता माझ्या प्रचारासाठी मोदी आले आहेत. त्यात वावगे काय? असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला.

पाथर्डी : परळीमध्ये माझं काही खरं नाही ही अफवा आहे. पंतप्रधान मोदींना प्रचारासाठी यावे लागले, असे आमचे विरोधक म्हणतात. स्व.मुंडेंसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी, राजनाथसिंह आले होते. आता माझ्या प्रचारासाठी मोदी आले आहेत. त्यात वावगे काय? असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला.पाथर्डी येथील तिलोक जैन विद्यालयाच्या मैदानावरील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, माजी खासदार दिलीप गांधी, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट, पांडुरंग खेडकर, सोमनाथ खेडकर, सभापती चंद्रकला खेडकर, भिमराव फुंदे, मोहनराव पालवे, दिनेश लव्हाट, अरूण मुंडे, तुषार वैद्य, नितीन काकडे आदी व्यासपीठावर होते.मुंडे म्हणाल्या, राष्ट्रवादी व कॉँग्रेसचा गलथान कारभार जनतेने पाहिला आहे. त्यांनी केवळ जातीपातीचे राजकारण केले. त्यांना विकासाचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे त्यांच्या मागे जाऊ नका. ते बुडते जहाज आहे, असा टोला त्यांनी लगावला. मुंडे म्हणाल्या, परळी माझी आई आहे, तर पाथर्डी माझी मावशी आहे. पाथर्डीकरांनी माझ्यावर अमाप प्रेम केले आहे. इतके प्रेम कोणाला मिळते. आईपेक्षा मावशीची माया जास्त आहे, हे इथे जमलेल्या गर्दीवरून दिसत आहे. कितीही त्रास झाला व संघर्ष झाला तरी माझे आणि पाथर्डीचे एक विश्वासाचे नाते आहे. आमदार राजळे यांना मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध करून दिला. येणाºया निवडणुकीत भाजपचे सरकार येणार आहे. देशात व राज्यात भाजपचेच सरकार, खासदार भाजपचा मग आमदार दुसरा कशाला? त्यामुळे राजळे यांच्या मागे ताकद उभी करा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष केकाण, तर माणिकराव खेडकर यांनी आभार मानले.पंकजा मुंडे सीएमच्या घोषणा...किती मताधिक्क्याने तुम्ही मोनिका राजळे यांना विजयी करणार असा प्रश्न मुंडे यांनी केला असता काहींनी पंकजा मुंडे सीएम.. अशा घोषणा दिल्या.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर