नियमांचे पालन व्हावे अन्यथा कोरोना वाढला तर अर्थव्यवस्था धोक्यात - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:12 AM2021-01-25T06:12:13+5:302021-01-25T06:12:30+5:30

कोरोना अजून संपलेला नाही, हे लोकांनी ध्यानी घेतले पाहिजे. युरोपमध्येही परिस्थिती गंभीर आहे. इंग्लंडमध्ये ३५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

Rules must be followed otherwise the economy will be in danger if Corona grows - Sharad Pawar | नियमांचे पालन व्हावे अन्यथा कोरोना वाढला तर अर्थव्यवस्था धोक्यात - शरद पवार

नियमांचे पालन व्हावे अन्यथा कोरोना वाढला तर अर्थव्यवस्था धोक्यात - शरद पवार

googlenewsNext

अहमदनगर : कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाचे नियम अजून लागू आहेत. मात्र, लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पवार बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘दो गज दुरी, मास्क है जरूरी’ अशी जागृती केली जाते. मात्र, कार्यक्रमात तर सर्वजण खांद्याला खांदे लावून बसलेले आहेत. अनेकांच्या तोंडाला मास्कही नाहीत. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे नगर जिल्ह्यातील प्रमाण हे देशातील प्रमाणापेक्षा चांगले असून, ते ९७ टक्के इतके आहे. ही गोष्ट चांगली असली, तरी कोरोना अजून संपलेला नाही, हे लोकांनी ध्यानी घेतले पाहिजे. युरोपमध्येही परिस्थिती गंभीर आहे. इंग्लंडमध्ये ३५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. 

‘गरिबांकडूून पैसे मागू नका’
कोरोनाच्या काळात शहरातील सर्वच डॉक्टरांचे योगदान चांगले होते. म्हणूनच कोरोनावर मात करू शकलो. मात्र, अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जीवनदायिनी योजना लागू केल्यानंतर रुग्णांकडून पैसे मागू नका. रुग्णांना मोफत सेवा द्या. त्यांचे आशीर्वाद हॉस्पिटलचे मजले वाढविण्यासाठी कामी येतील, अशी अपेक्षा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून व्यक्त केली.

Web Title: Rules must be followed otherwise the economy will be in danger if Corona grows - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.