शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
4
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
5
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
6
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
7
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
8
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
9
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
10
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
11
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
13
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
14
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
15
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
16
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
17
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
18
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
19
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
20
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

अखंड हरिनाम सप्ताहाची मोहन भागवत यांना भुरळ

By शिवाजी पवार | Published: February 22, 2024 10:39 PM

सराला बेटावर मुक्काम : सद्गुरू श्री गंगागिरीजी संस्थानची होती ओढ.

लोकमत न्यूज नेटवर्क,  शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): सराला बेट येथील गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा पाहून प्रभावित झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे भेट देण्याची व्यक्त केलेली इच्छा गुरुवारी पूर्ण झाली. संघाच्या अखिल भारतीय ग्रामविकास अभ्यासवर्गाचे बेटावरील आयोजन त्यासाठी निमित्त ठरले.

सरसंघचालक मोहन भागवत हे दोन दिवसांच्या सराला बेट दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी जालना येथून त्यांचे दुपारी आगमन झाले. सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान, गोदावरी धाम येथे संघाचा ग्रामविकास अभ्यासवर्ग होत आहे. त्यासाठी देशभरातून ३५० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात ५० महिला व ३०० पुरुषांचा समावेश आहे. राज्यातील प्रमुख देवस्थानांचे २० महंत यावेळी उपस्थित होते. मोहन भागवत यांनी त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा केल्याची माहिती मिळाली.

भारतातील ४५ प्रांतातून ३५० जण या अभ्यासवर्गात ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, भागय्याजी, ग्रामविकास संयोजक डॉ. दिनेश उपस्थित आहेत.

सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या सप्ताहाचे दरवर्षी आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी सप्ताहाचे आयोजन स्थळ बदलले जाते. त्यासाठी विविध भागातील आयोजक सप्ताहाचा नारळ उचलतात. आयोजक बदलले, तरीही भाविकांच्या गर्दीचा नवा उच्चांक पाहायला मिळतो. अशाच एका सप्ताह वेळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. त्यावेळी गोदावरी नदीकाठच्या सराला बेट येथील सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थानला भेट देण्याची इच्छा मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती. संस्थानचे मठाधिपती यांनी मंगळवारी पत्रकारांना ही माहिती दिली होती. राज्यातील आध्यात्मिक क्षेत्रातील येणाऱ्या अडचणींवर महंतांशी भागवत यावेळी चर्चा करणार आहेत.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ