शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात रिमझीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:50 PM

शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून रिमझीम पाऊस झाला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी पावसातच झाली. शनिवारी रात्रीही अनेक ठिकाणी हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला. दरम्यान रविवारी सकाळपासून रिमझीम पाऊस सुरूच आहे.

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून रिमझीम पाऊस झाला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी पावसातच झाली. शनिवारी रात्रीही अनेक ठिकाणी हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला. दरम्यान रविवारी सकाळपासून रिमझीम पाऊस सुरूच आहे.शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील कुकाणा परिसरात २० मिनीटे जोरदार पाऊस कोसळला. रात्री रिमझीम सुरू होती. सोनईसह मुळाकाठ परिसरातही अधुनमधून हलक्या ते मध्यम सरी शनिवारी रात्री सुरू होत्या. पाचेगाव परिसरातही पाऊस झाला. पाचेगाव येथे २४ तासात ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ब्राम्हणी परिसरात जोरदार वाºयासह पावसाच्या सरी कोसळल्या. भेंडा परिसरातही शनिवारी रात्री जोरदार सरी कोसळल्या. जामखेड तालुक्यातील हळगाव पसिरातील अरणगाव, पिंपरखेड ेयेथे रात्री उशीरापर्यंत रिमझीम पाऊस कोसळला. यादरम्यान वा-यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरात पाऊस झाला. राशीन मंडलात समाधानकारक पाऊस झाला.  रविवारी सकाळीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता. हवामान खात्याने रविवार, सोमवारीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. 

टॅग्स :RainपाऊसAhmednagarअहमदनगर