१२ वाजेपर्यंत कळणार निकाल; आठ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:57 PM2019-10-23T12:57:51+5:302019-10-23T12:58:51+5:30

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी (दि.२४) सकाळी आठ वाजेपासून संबंधित मतदारसंघात सुरू होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण केली असून साधारण बारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

The results will be available till 7 o'clock; Voting will begin at eight o'clock | १२ वाजेपर्यंत कळणार निकाल; आठ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी

१२ वाजेपर्यंत कळणार निकाल; आठ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी

Next

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी (दि.२४) सकाळी आठ वाजेपासून संबंधित मतदारसंघात सुरू होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण केली असून साधारण बारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
विधानसभेच्या १२ मतदारसंघात सोमवारी ६९.४३ टक्के मतदान झाले. एकूण १२ जागांसाठी ११६ उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले असून गुरूवारी त्यांचा फैसला होणार आहे. मतदानानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर प्रशासकीय अधिकारी-कर्मचा-यांनी मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. प्रशिक्षित कर्मचा-यांना मतमोजणीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले. मतदानानंतर मतदारसंघातील मतदान यंत्र संबंधित तालुक्यातील स्ट्राँगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँगरूम शेजारील गोदामातच मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे. 
विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी प्रक्रियेसाठी २० पर्यवेक्षक, २० सहायक, २० सुक्ष्म निरीक्षक असे एकूण ६० अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वात कमी २० फे-या कोपरगाव, नेवासा, संगमनेर, शिर्डी या मतदारसंघात असल्याने सर्वात आधी येथील निकाल येण्याची शक्यता आहे. 
पारनेर, शेवगाव, कर्जत-जामखेड अशी होईल मतमोजणी
सर्वप्रथम टपाली व सैनिकी मतपत्रिकांची मोजणी. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी. एका फेरीत १४ टेबलवर १४ मतदान यंत्रांतील मते मोजणार. मतदान केंद्रांच्या संख्येनुसार फे-यांची संख्या. पहिल्या फेरीचा निकाल ९ वाजता येण्याची शक्यता. त्यानंतरच्या फे-यांचा निकाल २० ते २५ मिनिटांत येईल. दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार. २६ ते २७ फे-या असल्याने येथील निकाल शेवटी येण्याची शक्यता आहे. 
    मतमोजणीचे ठिकाण
अकोले -पॉलिटेक्निक वर्कशॉप व कन्या विद्या मंदिर, संगमनेर -सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल. शिर्डी -तालुका मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय. कोपरगाव-सेवानिकेतन कॉन्वेंट स्कूल. श्रीरामपूर -प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय. नेवासा-नवीन शासकीय धान्य गोडावून, सेंट मेरी स्कूल रोड. शेवगाव-तहसील कार्यालय. राहुरी-लोकनेते रामदास धुमाळ महाविद्यालय. पारनेर-न्यू आर्टस कॉलेज. अहमदनगर-वखार महामंडळ, नागापूर, एमआयडीसी. श्रीगोंदा-शासकीय धान्य गोडावून, पेडगाव रोड. कर्जत-जामखेड-तहसील कार्यालय.

Web Title: The results will be available till 7 o'clock; Voting will begin at eight o'clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.