राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत घर अन् दुकानांवरून उतरवले तिरंगे 

By सुदाम देशमुख | Published: August 21, 2022 08:53 PM2022-08-21T20:53:50+5:302022-08-21T20:54:04+5:30

हे सर्व करीत असताना काही राष्ट्रध्वज फाटले तर काही माखलेल्या स्थितीत मिळाले. ते सन्मानपूर्वक गोळा करण्यात आले.

Respecting the national flag, the tiranga was lowered from the houses and shops | राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत घर अन् दुकानांवरून उतरवले तिरंगे 

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत घर अन् दुकानांवरून उतरवले तिरंगे 

googlenewsNext

अहमदनगर : हर घर तिरंगा द्वारे 13-15 ऑगस्ट पर्यंत घरांवर राष्ट्रध्वज तिरंगा फडकिवण्याची परवानगी होती. परंतु आज देखील अनेक घरांवर हा तिरंगा दिवस रात्र फडकत होता. नियमाप्रमाणे राष्ट्रध्वज तिरांग्याला 15 ऑगस्ट सायंकाळीच सन्मानपूर्वक खाली घेऊन घडी करून चांगल्या ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. अनेकांनी तसे केले नसल्याने रविवारी घर घर लंगर सेवेच्या टीमने शहरात राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरण्याची मोहीम हाती घेतली.

हे सर्व करीत असताना काही राष्ट्रध्वज फाटले तर काही माखलेल्या स्थितीत मिळाले. ते सन्मानपूर्वक गोळा करण्यात आले. घर घर लंगर सेवेच्या टीमने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि मोहीम सुरू करण्यात आली. शहरातील चाणक्य चौक, महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड, बंगाल चौकी, माणिक चौक, आशा टॉकीज चौक, सेनापती बापट चौक, एम जी रोड, तेलिखुंत, सर्जेपुरा, अबॉट पेट्रोल पंप जवळ, गेली वाडा या ठिकाणी मोहीम हाथी घेण्यात आली. रविवारी  सुमारे शंभर झेंडे सन्मानाने खाली घेण्यात आले.

या प्रसंगी हरजीतसिंह वधवा, प्रशांत मूनोत, मनोज मदान, कैलाश नवलानि, सुनील थोरात, शरद बेरड, प्रमोद पांतम, गोविंद खुराणा, पूर्शूताम बेट्टी, किशोर मुनोत, पृथ्पालसिंह धुप्पर, गुलशन कांत्रोड, सतीश गंभीर, दलजीत सिंह वधवा, सनी वधवा आदींनी मोहिमेत भाग घेऊन जन जागृती केली.या वेळेस हरजीतसिंह वधवा यांनी आवाहन केले की, ज्यांनी राष्ट्रध्वज नाही उतरविले त्यांनी उतरून घ्यावेत आणि जिथे आपल्याला खराब स्थितित राष्ट्रध्वज आढलल्यास ते आपण गोळा करावा असे आवाहन  वधवा यांनी केले.

Web Title: Respecting the national flag, the tiranga was lowered from the houses and shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.