शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

श्रीरामपूर शिवसेनेत बंडाळी; कांबळे यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 2:43 PM

शिवसेनेत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम मानला जात असला तरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मात्र अंतर्गत कलह उफाळून आला आहे.

श्रीरामपूर : काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यास शिवसेनेतूनच जोरदार विरोध सुरू झाला आहे. मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रसंगी पदाचे राजीनामे देण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे यातील काही पदाधिकारी हे खासदार सदाशिव लोखंडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिवसेनेत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम मानला जात असला तरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मात्र अंतर्गत कलह उफाळून आला आहे.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. खासदार सदाशिव लोखंडे यांची पत्रकार परिषद असल्याचे निरोप देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात लोखंडे हे गैरहजर राहिले. त्यांच्या गैरहजेरीत उप जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, ज्येष्ठ नेते अशोक थोरे, सचिन कोते, प्रदीप वाघ, राजेश तांबे, शरद भणगे, आबासाहेब बडाख, निखिल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.उपजिल्हा प्रमुख देवकर यांनी भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध दर्शविला. कांबळे यांच्या पक्षप्रवेशाचे आपण स्वागत करतो. पक्ष विस्तारासाठी ते गरजेचे आहे. मात्र मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे साहित्यिक लहू कानडे, डॉ.चेतन लोखंडे, रामचंद्र जाधव यांच्यासारखे अनेक सक्षम उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे कांबळेंसारख्या आयात उमेदवाराची आवश्यकता नाही. त्यामुळे पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल असा इशारा यावेळी देवकर यांनी दिला.कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काही स्थानिक पदाधिका-यांनी दिशाभूल केली. शहर प्रमुख सचिन बडधे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी चुकीची माहिती दिली. संघटनेला कुठेही विश्वासात घेतले नाही. अशा पदाधिका-यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी देवकर यांनी केली.आमदार कांबळे यांनी यापूर्वी दिवंगत नेते जयंत ससाणे, मंत्री राधाकृष्ण विखे तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी गद्दारी केली. त्यामुळे शिवसेनेतील सामान्य कार्यकर्त्यांचा ते कधीही विश्वासघात करतील अशी भिती देवकर यांनी व्यक्त केली.दरम्यान, तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे यांनी आपण स्वत: उद्धव ठाकरे यांच्याकडे डॉ.चेतन लोखंडे यांच्या उमेदवारीची मागणी केल्याचे सांगितले. कांबळे यांच्या उमेदवारीला माझा विरोध आहे. मात्र पदाचा राजीनामा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.मातोश्रीवर भेट घेऊन काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाऊसाहेब कांबळे हे प्रचाराला लागले आहेत. सोमवारी त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शिवसेनेची उमेदवारी आपल्यालाच असल्याचा त्यांचा दावा आहे.दुसरीकडे संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, खासदार सदाशिव लोखंडे, तसेच जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी अद्याप कांबळे यांच्या पक्षप्रवेश व संभाव्य उमेदवारीवर कुठलेही भाष्य केलेले नाही.

दहा हजार शिवसैैनिक विरोध करणार

शिवसेना पदाधिकारी हे कांबळे यांच्या पक्ष प्रवेशाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.५) उद्धव ठाकरे यांना दहा हजार शिवसैैनिकांच्या सह्यांचे पत्र देत उमेदवारीला विरोध करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच पक्षात मोठा संघर्ष उफाळून आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेनाshrirampur-acश्रीरामपूरBhausaheb Kambleआ. भाऊसाहेब कांबळेcongressकाँग्रेस