शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
2
"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 
3
Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास
4
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
5
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा
6
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
7
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
8
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
9
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
10
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
12
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
13
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
14
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
15
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
16
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
17
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
18
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
19
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
20
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!

व्यायामासाठी ‘सायकल’ धावली; जीम बंदमुळे घरातच व्यायाम

By सुदाम देशमुख | Published: June 17, 2020 12:15 PM

कोरोना लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी व्यायामशाळा, जीम सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे घरातच व्यायाम करण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. नगर शहरात रोज ७० ते ८० सायकलींची खरेदी होत असून यातून किमान ८० लाखांच्यावर उलाढाल होत आहे. नेहमीपेक्षा सायकलींना दहापट मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी व्यायामशाळा, जीम सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे घरातच व्यायाम करण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. नगर शहरात रोज ७० ते ८० सायकलींची खरेदी होत असून यातून किमान ८० लाखांच्यावर उलाढाल होत आहे. नेहमीपेक्षा सायकलींना दहापट मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आरोग्य ठणठणीत असणे ही आता प्रत्येकाचीच गरज बनली आहे. जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याची सवय असलेल्यांची पंचायत झाली होती. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच दुकाने उघडली आणि अनेकांनी सायकल खरेदीला पसंती दिली.

 जीमला जाणारे आता सकाळी सायकलवर फिरताना दिसत आहेत. याशिवाय घरातच सायकलिंग करण्यावर लोकांचा भर आहे. त्यासाठी विशेष सायकली बाजारात उपलब्ध आहेत.

गिअरची सायकल, मोठ्या टायरची सायकल, ट्रेड मिल, एअर बॅग्ज, बेअरिंग सायकल खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. लहान मुलांसाठीही खास फॅड बाईक सायकल आलेल्या आहेत. त्यावरही चांगला व्यायाम होतो. वाहतूक सुरू झाल्याने सायकलींचा पुरवठा सध्या तरी व्यवस्थित सुरू आहे.

डंबेल्सची टंचाईव्यायामासाठी डंबेल्सलाही मोठी मागणी वाढली आहे. शंभर किलोपासून ते पुढील वजनाचे वेगवेगळ््या वजनातील डंबेल्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र सध्या काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा येत असल्याने नगरमध्ये डंबेल्सची टंचाई निर्माण झाली आहे. आतापर्यंत रोज १० ते १२ सेट विक्री होतात, असे विक्रेत्यांनी सांगितले. एक ते दीड हजारापासून त्याच्या किंमती आहेत. 

साध्या सायकली, फॅड बाईकला लहान मुलांची पसंती आहे. ट्रेड मील, एअर बॅग्ज् व बेअरिंगच्या सायकलीच्या विक्रीचे प्रमाण पहिल्यापेक्षा दहापटीने वाढले आहे. व्यायामासाठी ग्राहक याच सायकलींची मागणी करतात, असे तारकपूर येथील विक्रेते सुरेश भागनानी यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCyclingसायकलिंगHealthआरोग्य