राधाकृष्ण विखे म्हणतात...सरकारमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही; त्यांनी भाजपची चिंता करु नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 02:41 PM2020-05-22T14:41:04+5:302020-05-22T14:41:53+5:30

राज्यातील आघाडी सरकारमध्ये सध्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्यांनी भाजपची चिंता करु नये, अशी टीका भाजपचे माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.

Radhakrishna Vikhe says ... Congress does not exist in the government; They should not worry about BJP | राधाकृष्ण विखे म्हणतात...सरकारमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही; त्यांनी भाजपची चिंता करु नये

राधाकृष्ण विखे म्हणतात...सरकारमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही; त्यांनी भाजपची चिंता करु नये

Next

लोणी : राज्यातील आघाडी सरकारमध्ये सध्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्यांनी भाजपची चिंता करु नये, अशी टीका भाजपचे माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारला पूर्णत: अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर लोणी बुद्रूूूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.२२ मे) आ.विखे यांच्या नेतृत्वाखाली फिजीकल डिस्टसिंगचा नियम पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार विखे बोलत होते.  
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी  भाजपच्या आंदोलनावर टीका केली होती.  थोरात यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेताना आ.विखे म्हणाले, काँग्रेसचे सरकारमध्ये अस्तित्वच आता कुठे दिसत नाही. त्यामुळे त्यांनी भाजपची चिंता करु नये. नगर जिल्ह्यात सरकारचे तीन मंत्री आहेत. असे असताना नगर जिल्ह्यातील जनतेला हे दिलासा देवू शकले नाहीत. शेतक-यांसह जिल्ह्यातील जनता त्यांनी वा-यावर सोडली, असा आरोपही विखे यांनी केला. 

Web Title: Radhakrishna Vikhe says ... Congress does not exist in the government; They should not worry about BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.