शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

मुलगा जिल्ह्यातच मोठा साहेब झाल्याचा अभिमान; माता-पित्यांनी कार्यालयात येऊन दिले आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 2:30 PM

कष्ट घेत मुलाला शिकविले, मुलानेही आमच्या कष्टाचं सोनं केलं. आता साहेब झालेला आमचा मुलगा जिल्ह्यातच रुजू झालायं याचा मोठा अभिमान आहे़, अशी भावना अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे माता-पिता उद्धवराव व जमुनाबाई यांनी व्यक्त केली.

अहमदनगर : कष्ट घेत मुलाला शिकविले, मुलानेही आमच्या कष्टाचं सोनं केलं. आता साहेब झालेला आमचा मुलगा जिल्ह्यातच रुजू झालायं याचा मोठा अभिमान आहे़, अशी भावना अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे माता-पिता उद्धवराव व जमुनाबाई यांनी व्यक्त केली.

डॉ. राठोड यांनी नुकताच नगरचा पदभार स्वीकारला आहे. त्यांचे मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील शिरापूर आहे. सोमवारी डॉ़. राठोड यांचे वडील उद्धवराव व आई जमुनाबाई यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन डॉ. राठोड यांना आशीर्वाद देत त्यांचे कार्यालय डोळे भरून पाहिले़. 

यावेळी डॉ. राठोड यांनी माता-पित्यांचे दर्शन घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, आई निरक्षर तर  वडील हे पहिली शिकलेले आहेत. आयुष्यभर त्यांनी ऊसतोडणी मजुरीसह अनेक कष्टांची कामे केली.  मात्र मुलांनी शिकून मोठं व्हाव़, असे त्यांचे स्वप्न होते. माता-पित्यांचे खडतर परिश्रम मी आयुष्यात कधीच विसरलो नाही. गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ते  मला प्रेरणा व  ताकद देतात असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPolice Stationपोलीस ठाणे