लोणी : राहाता तालुक्यातील कोल्हार येथील रहिवासी आणि लोणी येथील विखे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय प्राध्यापकांने आपल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे लक्षात आली.
सोमनाथ शांताराम निबे (रा.कोल्हार ) असे आत्महत्या केलेल्या या प्राध्यापकाचे नाव असून ते लोणी येथील विखे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते.
प्रा. निबे यांचा मृतदेह कोल्हार जवळील त्यांच्या वस्तीवरील विहिरीत शनिवारी (३ आक्टोबर) सकाळी आढळून आला. या विहिरी लगतच त्यांची मोटारसायकल लावलेली होती.
तपासा दरम्यान निबे यांच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी आढळून आली. कौटुंबिक कारणांमुळे निबे यांनी आपली जीवन यात्रा संपवली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी आहे. पुढील तपास सहाय्य पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी करत आहेत.
Web Title: Professor's well suicide
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.