शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची उत्पादने मिळणार एकाच दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:17 PM

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात विक्री केंद्र सुरू केली आहेत. 

राहुरी : विद्यापीठाच्या बियाण्यांना आणि उत्पादनांना शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. विद्यापीठाचे उत्पादने खरेदी करण्यासाठी शेतकºयांना संबंधित विभागात जावे लागत असे. त्यामुळे शेतकºयांचा वेळ खर्च व्हायचा. हा वेळ वाचविण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात विक्री केंद्र सुरू केली आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राचे उद्घाटन कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, डॉ. प्रकाश तुरबतमठ, डॉ. दिलीप पवार, डॉ. आनंद सोळुंके उपस्थित होते.विविध पिकांच्या वाणांचे बियाणे, कलमे रोपे, जैविक खते, जैविक  कीडनाशके, प्रक्रिया पदार्थ आणि बेकरी उत्पादने, विद्यापीठ प्रकाशने, बांबू हस्तकला उत्पादने, कृषी यंत्रे व अवजारे आदी एकाच दालनात शेतकºयांना मिळणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठात हे विक्री केंद्र हायवेलगत विद्यापीठाच्या पेट्रोल पंपाजवळ सुरु केले आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, नंदूरबार, नाशिक आणि जळगाव या दहा जिल्ह्यातील २७ संशोधन केंद्रांवर विद्यापीठ उत्पादने विक्री केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण सर्व उत्पादने वरील दहा जिल्ह्यातील गावपातळीपर्यंत पोहोच करण्यासाठी विपणन साखळी निर्माण करण्यात आलेली आहे. विद्यापीठस्तरावर विपणन अधिकारी हे पद निर्माण करण्यात आलेले असून या पदावर डॉ.पी.एस. बेल्हेकर यांची नियुक्ती केली आहे.विपणन अधिकारी यांना मदतनीस म्हणून दोन विक्री प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येणार आहे. हे विक्री प्रतिनिधी दोन जिल्ह्यात विपणन व्यवस्थापन करतील. शेतकरी गटांना सवलतच्शेतकºयांनी एकत्रित गट करुन मोठ्या प्रमाणावर विद्यापीठाची उत्पादने खरेदी केल्यास तसेच खासगी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विद्यापीठ उत्पादने खरेदी केल्यास खरेदी रकमेवर सवलत देण्यात येणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी