प्राथमिक आरोग्य केंद्राला आठवड्यातून मिळाले दोनशे लसीचे डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:54+5:302021-04-24T04:19:54+5:30

२० किलोमीटर अंतरावरील नागरिक लस टोचून घेण्यासाठी आपला नंबर लागावा, यासाठी सकाळी सहा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होतात. ...

The primary health center received 200 doses of the vaccine a week | प्राथमिक आरोग्य केंद्राला आठवड्यातून मिळाले दोनशे लसीचे डोस

प्राथमिक आरोग्य केंद्राला आठवड्यातून मिळाले दोनशे लसीचे डोस

Next

२० किलोमीटर अंतरावरील नागरिक लस टोचून घेण्यासाठी आपला नंबर लागावा, यासाठी सकाळी सहा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होतात. लस उपलब्ध नसेल अथवा नंबर लागला नाही, तर आल्या पावली परत जातात. यामध्ये वयोवृद्ध नागरिकांची मोठ्या प्रमाणात फरफट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास उपस्थित असणाऱ्या नागरिकांना उपलब्ध झालेल्या दोनशे लसींचे नंबर टोकण आरोग्य कर्मचाऱ्यांनी वाटप केले. मात्र, ज्या नागरिकांना लसीकरणासाठी नंबर टोकण मिळाले नाही. त्यांनी सकाळी दहा वाजेपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. काही उशिरा आलेल्या लोकांनी तर एवढ्या सकाळी नंबर वाटलेच कसे, असा प्रश्न उपस्थित करून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारायला सुरुवात केली. कोरोनासारख्या महामारीत लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना लोकांना समजावून सांगत आपले काम चालू ठेवावे लागले. जर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसच आली नाही, तर बिचारे कर्मचारी काय करणार. मात्र, लोकांच्या रोषाला त्यांनाच सामोरे जावे लागते. यात लोकांचीही चुक नाही, कारण ते ही हेलपाटे मारून वैतागलेले असतात. त्यामुळे शासनाने कोरोना लसींचा पुरवठा सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. आता ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरळीत चालू नसताना, केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरीकांचे १मेपासून सरसकट लसीकरण करण्याबाबत घोषणा केली. त्यावेळी लसीकरणासाठी नंबर लावण्याकरिता लोकांना आपआपसात वाद घालण्याची वेळ येणार आहे.

.........

प्राथमिक आरोग्य केंद्रात जेवढे कोरोना लसीचे डोस उपलब्ध होतील, ते नागरिकांना सुरळीतपणे देण्याचा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मात्र, लसीचे डोस मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत नसल्याने लोकांना समजावून सांगणे कठीण होते आहे. लोकांनी संयम बाळगण्याची गरज आहे.

- डॉ.जयदेवी राजेकर, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव पिसा

Web Title: The primary health center received 200 doses of the vaccine a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.