शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची झाकली मूठ

By मिलिंदकुमार साळवे | Published: November 28, 2018 3:49 PM

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज गेल्यावर्षी २०१७-१८ मध्ये सर्व्हर व आॅनलाइनच्या गोंधळात अडकले. त्यामुळे गेल्यावर्षीचे हे रखडलेले अर्ज यंदा आॅफलाइन पद्धतीने भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज गेल्यावर्षी २०१७-१८ मध्ये सर्व्हर व आॅनलाइनच्या गोंधळात अडकले. त्यामुळे गेल्यावर्षीचे हे रखडलेले अर्ज यंदा आॅफलाइन पद्धतीने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्तीची अवस्था ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ अशी झाली आहे. त्यामुळे २०१८-१९ चे प्रथम सत्र संपून गेल्यानंतरही गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्तीधारकांची माहिती सामाजिक न्याय विभागाकडे संकलित होऊ शकलेली नाही.गेल्यावर्षी सर्व्हर व रेंज अशा संगणकीय गोंधळामुळे आॅनलाइन प्रणालीचा फज्जा उडाला. त्यामुळे गेल्यावर्षी अनेक विद्यार्थी अर्ज भरूनही शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. त्यांना यावर्षी आॅफलाइन अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महाविद्यालय स्तरावरच हे अर्ज सादर केले जात आहेत. यंदाचे निम्मे शैक्षणिक वर्ष उलटून गेल्यानंतरही महाविद्यालयांकडून संकलित माहिती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे जातनिहाय वर्गवारीनुसार किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, किती जणांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरले, किती जणांना शिष्यवृत्ती मंजूर झाली? याची माहिती संकलित होऊ शकलेली नाही. दरम्यान २०१८-१९ मध्ये शिष्यवृत्तीसाठी ३९ कोटी रूपयांची पुरवणी मागणी विभागामार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. १८-१९ या शैक्षणिक वर्षात मात्र सर्व शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानुसार महाविद्यालय स्तरावर ५३५६ अर्ज प्रलंबित आहेत.२०११-१२ ते २०१७-१८पर्यंतची स्थितीसामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दहावीपुढील शिक्षणासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. वार्षिक २ लाख रूपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती तर त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाºया पाल्यांच्या पालकांना फ्रिशीप दिली जाते. २०११-१२ मध्ये शिष्यवृत्तीसाठी १५ हजार १२८ व फ्रिशीपसाठी १४७० अर्ज दाखल होते. त्यातील शिष्यवृत्तीचे १४६२६ व फ्रिशीपचे १३९० अर्ज निकाली काढले. १२-१३ मध्ये शिष्यवृत्तीचे १६५५४ व फ्रिशीपचे १८२४ अर्ज दाखल होते. यापैकी १५३८५ व १७११ अर्ज निकाली काढले. २०१५-१६ मध्ये शिष्यवृत्तीसाठी १९१३१, फ्रिशीपसाठी २१३४ अर्ज आले असताना यातील १७९९० व १९३२ अर्ज निकाली निघाले. २०१६-१७मध्ये शिष्यवृत्तीसाठी १८९५४ व फ्रिशीपसाठी २०५९ अर्ज आले होते. यापैकी १७३२४ व १८७६ अर्ज निकाली निघाले. २०१७-१८ मध्ये शिष्यवृत्तीसाठी १४९६९ व फ्रिशीपसाठी १५६७ अर्ज आॅनलाइन दाखल झाले होते. यापैकी १३९२३ व १४५० अर्ज निकाली काढण्यात आले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका