Police stop collector's car; Appreciated the work done | पोलिसांनी अडविली जिल्हाधिका-यांची कार;  झाले कामाचे कौतूक

पोलिसांनी अडविली जिल्हाधिका-यांची कार;  झाले कामाचे कौतूक

अहमदनगर : नगर शहरातील कोठला परिसरात शनिवारी  (दि. ५ एप्रिल) रात्री अकरा वाजता  लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके हे स्वत: पथकासह तैनात होते.  याच वेळी पोलिसांना समोरून एक कार येताना दिसते.  पोलीस इशारा करून ती कार अडवितात.  पोलीस पुढे काही कारवाई करणार तोच त्या कारमधून चक्क जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उतरताना दिसले. यानंतर द्विवेदी यांंनी पोलीस कर्मचा-यांजवळ येऊन त्यांच्या कामाचे कौतूक केले.
रस्त्यात वाहन अडविले म्हणून नगर शहरात पोलिसांशी दररोज अनेक जण हुज्जत घालताना दिसतात.  येथे मात्र कार अडविल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी उपधीक्षक मिटके व  इतर पोलीस कर्मचा-यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतूक करीत समाजासाठी एक चांगला संदेश दिला आहे. कोरोना साथीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहेत. जमावबंदी, संचारबंदीसह शहरांसह ग्रामीण भागातही लॉकडाऊन आहे.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे रात्रंदिवस परिस्थितीवर लक्ष्य ठेवून आहेत. तसेच ते स्वत: रस्त्यावर उतरून आदेशाच्या अंमलबजावणीबाबत पोलिसांसह इतर शासकीय कर्मचा-यांना वेळोवेळी सूचना देत आहेत.  रात्री शहरातील शहरातील परिस्थिती काय आहे? नागरिक रस्त्यावर दिसतात का? पोलीस बंदोबस्त कसा आहे. हे पाण्यासाठी जिल्हाधिकारी रात्री खासगी कारने स्वत: ड्रायव्हिंग करीत फेरफटका मारतात.  शनिवारी रात्रीही खासगी कारमधून शहरातील परिस्थिती पाहत असताना पोलिसांची सतर्कता जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आली.  कारच्यावरती दिवा नसल्याने त्या कारमध्ये कोण आहे? याची कल्पना पोलीस अधीक्षक संदीप मिटके व कर्मचा-यांना नव्हती.  विशेष म्हणजे यावेळी जिल्हाधिकारी स्वत: ही करत चालवित होते. पोलिसांनी कार अडविल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नागरिकांसाठी खडा पहारा देणारे पोलीस अधीक्षक संदीप मिटके व इतर पोलीस कर्मचा-यांचे कौतूक केले.

शनिवारी रात्री नगर शहरात खासगी कारमधून फेरफटका मारत असताना पोलिसांनी माझी कार अडविली. यावेळी पोलीस यंत्रणेची सतर्कता निदर्शनास आली.  यावेळी मी तेथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे कौतूक केले.  कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी जनतेसाठी तैनात असलेले पोलीस व प्रशासनाला जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांंनी केले आहे. 

Web Title: Police stop collector's car; Appreciated the work done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.