शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणा-या २२ जणांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 3:23 PM

पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या २२ आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ठळक मुद्देकार्यालायवर दगडफेक

अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या २२ आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रात्री अटक केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले होते.कैलास गिरवले, शरिफ शेख, राहुल अरुण चिंतामण, अ‍ॅड. प्रसन्न जोशी, सय्यद अकबर, आवेश शेख, सय्यद असिफ, सागर वाव्हळ, संजय वाल्हेकर, अनिल राऊत, अनिकेत चव्हाण, गिरीष गायकवाड, दिपक गाडीलकर, रियाज तांबोळी, दत्ता उगले, कुणाल घोलप, साईनाथ लोखंडे, सचिन गवळी, सोमनाथ गाडेकर, संतोष सुर्य वंशी, धर्मा करांडे, इम्रान शेख या २२ आरोपींना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.याशिवाय भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले, दादाभाऊ कळमकर, सचिन अरुण जगताप, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, अभिजित खोसे, कुमार वाकळे, निखिल वारे, दादा दरेकर, गजानन भांडवलकर, मुसा सादीक शेख, सागर ठोंबरे, घनश्याम बोडखे, सागर पंधाडे, मतीन सय्यद, सुरेश बनसोडे, सागर डोंगरे, अफजल शेख, कुलदीप भिंगारदिवे, बबलू सुर्यवंशी, विशाल सुर्यवंशी, सुनिल त्रिंबके, दत्ता तापकीरे, अंकुश चत्तर, वैभव वाघ, सादीक अब्दुल रौफ सय्यद, मुस्सदीक सादीक सय्यद, अवधूत जाधव, राजेश परकाळे, धीरज उर्कीडे, मयूर कुलथे यांच्यावरही तोडफोडप्रकरमी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केडगाव येथील सेनेच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन अनधिकृतरित्या कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस नाईक संदीप घोडके यांना मारहाण करुन जखमी केले. भिंगार पोलीस ठाण्यात भादवि ३५३, ३३३,१४३, १४७,१४८, १४९, ४५२, ४२७, ३२३, ५०४ सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३,७ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसSangram Jagtapआ. संग्राम जगतापShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेArun Jagtapआ. अरुण जगतापKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड