शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पोलिसांसमोरच सराफाने घेतले विष :चोरीचे सोने घेतल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 4:24 PM

शहरातील सराफ व्यावसायिक गोरख दिगंबर मंडलिक (वय ५०) यांनी पोलिसांसमोरच दुकानात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .

श्रीरामपूर : शहरातील सराफ व्यावसायिक गोरख दिगंबर मंडलिक (वय ५०) यांनी पोलिसांसमोरच दुकानात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरून संगमनेर पोलीस चौकशीसाठी आले असता बुधवारी दुपारी १२ वाजता हा प्रकार घडला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सराफ व्यावसायिकांनी बंद पाळत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.बुधवारी संगमनेर येथील काही पोलीस कर्मचारी मुंडलीक यांच्या दुकानात आले. त्यांनी चोरीचे सोने खरेदी केल्याचा आरोप मुंडलीक यांच्यावर केला. त्याच वेळी त्यांनी विषारी औषध प्राशन केले. व्यावसायिकांनी त्यांना तातडीने शहरातील साखर कामगार रुग्णालयात भरती केले. त्यांचीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजली.दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून मुंडलीक यांना त्रास दिला जात होता असा आरोप व्यावसायिकांनी केला. हा काही पहिला प्रकार नसून अनेकांना त्रास दिल्याच्या घटना व्यावसायिकांनी कथन केल्या. घटनेची वार्ता पसरताच सराफ व्यावसायिकांनी बंद पाळला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या कार्यालयात मोठा जमाव जमला होता. घडलेल्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक दिलीप नागरे, प्रकाश कुलथे, सोमनाथ महाले, हेमंत दहिवाळ, मनोज चिंतामणी, उमाकांत लोळगे, दिनकर उदवंत, गणेश मुंडलिक, श्रीकांत दहिवाळ, बाळासाहेब नागरे, गणेश दहिवाळ, योगेश मुंडलिक, उमेश मैड आदी व्यावसायिक उपस्थित होते.गुन्हा दाखल करण्याची मागणीसंगमनेर येथील पोलीस शहरात येत व्यावसायिकांना वेठीस धरतात. मात्र श्रीरामपूर पोलिसांना त्याची खबर देत नाहीत यावर अनेकांनी आक्षेप घेतला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. घटनेची माहिती घेऊन उचित कारवाइ केली जाईल, अशी ग्वाही पवार यांनी व्यावसायिकांना दिली. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर